कामोठे ब्रिजखालचा अंधार दुर होणार

सचिन गायकवाड यांचा  यशस्वी पाठपुरावा
कामोठे/प्रतिनिधी
पनवेल-सायन महामार्गावर कामोठे  येथील पुलाखाली अंधाराचे साम्राज्य आहे.याकरीता  शेकापचे युवा नेते  सचिन गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम  विभागाकडे पाठपुरावा केला.याबाबत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.त्यानंतर हा विभाग खडबडून जागा झाला आणि येथे  स्वतंत्र रोहित्र बसवले. सात दिवसात  या ठिकाणी  दिवे  पेटतील अशी  ग्वाही  संबधित विभागाकडून देण्यात आली.
सा.बा . विभागार्तंगत येत असलेल्या   विद्युत  पुरवठा विभागाचे सहाय्यक आभियंनता विजय सानप यांनी बुधवारी कामोठे ब्रिज खाली भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी  केली. यावेळी   सचिन गायकवाड ,बापू साळुंखे उपस्थित होते.सिग्नल यंत्रणा लवकरच कार्यन्वित केली जाणार  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.