प्रशांत रणवरेंचा भाजपात प्रवेश 

 आ.प्रशांत ठाकूरांनी केले स्वागत
पनवेल/प्रतिनिधी
कळंबोली विकास समितीच्या माध्यमातुन सिडको, सा.बा.विभाग तसेच इतर यंत्रणांना घाम  फोडणारे  प्रशांत रणवरे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.आमदार प्रशांत ठाकुर यांनी त्यांचे स्वागत केले.अगामी काळात कळंबोलीकरांचे प्रश्न सोडविण्याकरीता आ.ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली काम करू अशी  ग्वाही  रणवरे यांनी दिली.
कळंबोली विकास समितीची स्थापना करून प्रशांत रणवरे यांनी गेल्या काही महिन्यात अनेक मुलभुत प्रश्न हाती घेतले. विशेष करून रस्ते,पाणी ,नाले,मलनिःसारण वाहिन्या  याखेरीज अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला.याशिवाय  पनवेल-सायन महामार्गावरील खड्डे, बंद पडलेले  पथदिवे  याबाबत सार्वजनिक बांधकाम  विभागाला  वठणीवर आणले. माहिती अधिकाराचा जनहिताकरीता वापर  रणवरे यांनी केला.आमदार प्रशांत ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली काम केले तर कळंबोलीकरांकरीता प्रभावी काम करता येईल या भावनेतुन आपण भाजपचे कमळ हातात घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत प्रशांत रणवरे यांनी व्यक्त केले. या करीता  कळंबोली उपशहराध्यक्ष  नितीन काळे  यांनी समन्वयाची भूमिका बजावली. त्यानुसार शनिवारी  पक्षाच्या  पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी  कळंबोली शहराध्यक्ष रवी पाटील,नितीन  काळे, नगरसेवक प्रकाश बिनेदार,नगरसेविका मोनिकताई महानवर
गगन भाई,राजु बनकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.