सापळयातअडकला खवल्या मांजराचा तस्कर

आंतरराष्ट्रीय बाजारात चाळीस लाख रूपये किंमत

गुन्हे शाखेच्या युनीट तीनची कामगिरी

पनवेल/प्रतिनिधी- अतिसंरक्षित आणि दुर्मीळ अशा खवल्या मांजर घेवून जात असलेल्या एकाला  नवी मुंबई गुन्हेशाखेच्या युनीट तीनच्या पथकाने शनिवारी दुपारी पकडले. मुंबई-गोवा महामार्गावर शिरढोण येथे वन विभागाच्या मदतीने पोलीसांनी सापळा रचला. सदर खवल्या मांजराची आंतरराष्ट्रीय बाजारात चाळीस लाख रूपये किंमत असल्याची माहिती पुढे आली आहे.

दुर्मिळ जातीचे नामशेष असलेले खवल्या मांजर हे वन्यजीव  घेवून एक व्यक्ती  शिरढोण गावच्या हद्दीत क्षणभर विश्रांती येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक अनिल सुरवसे यांना गुप्त बातमीदाराकडून शनिवारी मिळाली. याबाबतची माहिती सुरवसे यांनी युनीट तीनचे प्रभारी अधिकारी विजय कादबाने यांना दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोषी, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम यांनी   पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार  कादबाने यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रताप कदम,अनिल सुरवसे, सुनिल सावंत, पोलीस हवलदार मनोज चौधरी, प्रविण बावा, कृष्णा मोरे, किशोर बोरसे, सोनलकर यांनी दुपारी एक वाजता सापळा रचला. त्यामध्ये समय बामणे (४०) राहणार महाड हा आरोप अडकला.त्यांच्याकडे असलेल्या सॅकबॅगमध्ये जिवंत खवल्या मांजर मिळाले. पोलीसांबरोबरच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहीमेत सहभाग घेतला.सदर प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले आहे. हा वन्यजीव नेमका कुठून आणला आणि त्याची विक्री कुठे केली जाणार होती. या पाठीमागे नेमका कोणाचा हात आहे तसेच तस्करीचे रॅकेट आहे का याबाबत तपास सुरू असल्याचे माहिती विजय कादबाने यांनी दिली.

खवल्या मांजराला इतक  महत्व का?

खवल्या मांजर म्हणजेच इंडियन पॅगोलीन  हा सस्तन प्राणी आहे.अफ्रिका, भारत आणि मध्य अशियाच्या जंगलात हा प्राणी आढळतो. या प्राण्याच्या शरिराचा काही भाग त्वचा विकार आणि असाध्य अजारांवर गुणकारी म्हणून समजला जातो, चीन आणि व्हियतनाममध्ये खवल्या मांजराचे मांस खालले जाते त्यामुळे नेपाळ, भुतान मार्ग चीनला मोठया प्रमाणा तस्करी होते. गेल्या काही वर्षात या दुर्मिळ आणि अतिसरंक्षित वन्यप्राणीचे सहा हजारांपेक्षा जास्त तस्करी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चाळीस लाखांपासून सव्वा कोटीपर्यंत खवले मांजर विकले जाते. वाघाच्या श्रेणीत असलेल्या या प्राणीची तस्करी करणे म्हणजे कायदयानुसार गंभीर गुन्हा मानला जातो.