खांदा वसाहतीतील उघडे गटारे  झाकणार

नगरसेवक संजय भोपी यांचे सिडकोला स्मरण

पनवेल/प्रतिनिधी खांदा वसाहतीतील  बंदिस्त पावसाळी गटारांची अवस्था बिकट आहे. विशेष करून सेक्टर-८मध्ये अनेक ठिकाणी झाकणे गायब झाले आहेत तर काही जागेवर प्लॅस्टर निखळले आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक संजय भोपी यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर गुरूवारी स्मरणपत्र दिल्याने अधिकाऱ्यांना जाग आली पंधरा दिवसात याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही भोपी यांना देण्यात आली

सेक्टर  ८ मध्ये सिडकोच्या ए आणि बी, सी, डी टाईपच्या इमारती आहेत. या ठिकाणी सिडकोने फार पुर्वी बंदिस्त पावसाळी गटारे बांधले आहेत. त्याची नियमीत डागडुजी आणि दुरूस्थी होत नसल्याने काही ठिकाणी अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पदपथावर चालताच येत नसल्याने पादचाऱ्यांची गैरसोयी होते. या ठिकाणी दोन वेळा अपघात होवून पादचारी जखमी झाले. त्यामुळे  गजानन आणि  त्रिमूर्ती सोसायटीच्या रहिवाशांनी संजय भोपी यांच्याकडे व्यथा मांडली होती.  त्यानंतर त्यांनी  त्वरीत या परिसरात जावून पाहणी केली आणि सिडकोला याबाबत कळवले. इतकेच नाही तर या  दुरावस्थेचे छायाचित्रण करून ते सिडकोत सादर केले. सिडको अधिकारी या ठिकाणी आले त्यांनी पाहिले आणि ते निघून गेले. प्रत्यक्षात काहीच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या संजय भोपी यांनी ३ जानेवारी रोजी सिडकोला स्मरणपत्र देवून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानुसार नव्याने रूजू झालेले अभियंता व्हि.एल. कांबळे यांनी सहाय्यक अभियंत्याला सर्व्हे करून त्वरीत दुरुस्थी करून घेण्याच्या सुचना दिल्या. पंधरा दिवसाच्या आत हे काम पूर्णत्वास येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.