कळंबोली सर्कलजवळ सिमेंट मिक्सर उटला

अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा,  डिझेलची टाकीही फुटली

पनवेल/प्रतिनिधी –  सिमेंट मिक्सर वाहनाने कळंबोली सर्कल येथे सोमवारी रात्री पावणे आकरा वाजण्याच्या सुमारास पलटी खालली. त्यामुळे  हे वाहने महामार्गावर आडवे झाले आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच टाकी फुटून डिझेल सुध्दा मोठया प्रमाणात सांडल्याने  अग्निशमन दलाला पाचरण करावे लागले

एमएच४६ एफ ५३२४ या  क्रमाकांचा सिमेंट मिक्सर जेएनपीटी दिशेकडून भरधाव वेगाने आला होता. कळंबोली सर्कलजवळ वाहन चालकाने ब्रेक दाबल्याने ही गाडी जाग्यावर पलटी झाली. सुदैवाने पाठीमागून येणाऱ्या वाहनांमध्ये जास्त अंतर असल्याने मोठी दुर्घटना घडली नाही.  सदर वाहनचालक अपघात झाल्यानंतर पळून गेला. या वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेच त्याचबरोबर टाकी फुटल्याने महामार्गावर डिझेल सांडले होते. त्यामुळे  कळंबोली वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी मुकेश पाटील, गोपिनाथ पठारे तसेच कामोठे पोलीस ठाण्यातील बिट मार्शलने वाहतुक काही काळ थांबवली आणि आणि कळंबोली अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचरण केले. अग्निशमन दलाच्या जवानाने माती टाकल्यानंतर एका बाजूने वाहने सोडण्यात आले. रात्री उशीरापर्यंत क्रेनच्या साहयाने पलटी झालेला सिंमेट मिक्सर महामार्गावरून  बाजुला करण्याचे काम सुरू होते

Leave a Reply

Your email address will not be published.