इराणचा क्रांतीदिन मुंबईत साजरा

नरीमन पाॅईट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये कार्यक्रम

राजशिष्टचार मंत्री प्रा. राम शिंदे यांची विशेष उपस्थिती

मुंबई/प्रतिनिधी चाळीस वर्षापुर्वी इराणी जनतेने केलेल्या क्रांतीदरम्यान इराणच्या शेवटच्या शहाचे राजतंत्र संपुष्टात आले. त्यानंतर राजतंत्राऐवजी येथे प्रजासत्ताकाची स्थापना झाली. तेव्हापासून ११ फेब्रुवारी हा क्रांती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मुंबई नरीमन पाँईट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांची उपस्थिती होती.

अमेरिका आणि ब्रिटनच्या  पाठिंब्यावर १९४१ सालापासून इराणच्या शहापदावर असलेल्या पेहलवी विरुद्ध ऑक्टोबर १९७७ साली बंडाला सुरू झाली. १९७८ साली ह्या चळवळीने देशव्यापी स्वरूप घेतले व अनेक संप व निदर्शनांमुळे इराणचे कामकाज व अर्थव्यवस्था ठप्प झाली. घाबरलेल्या पेहलवीने १६ जानेवारी १९७९ रोजी देशामधून पळ काढला. ११ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या चकमकीत बंडखोरांनी विजय मिळवून शहाची सत्ता संपुर्णपणे संपुष्टात आणली. त्यामुळे हा दिवस इराणचा क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने मुंबईतील इराणमधील दुतावासाच्या वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांनी उपस्थितीत राहून इराण ४० व्या क्रांती दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.आयोजकांनी प्रा. शिंदे यांचे स्वागत करून त्यांचा यथोचित सन्मान केला.यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सचिव व अधिकारी उपस्थित होते.