नवीन आहे! …. पण  साहेब व  दादांसारखे काम करून दाखवेल

पार्थ पवारांची मावळच्या मतदारांना ग्वाही

पहिली सभा आणि पहिले भाषण 

पिंपरी/प्रतिनिधी- जनतेने आमचे  कुटुंब तसेच   पक्षाला  प्रेम दिले. तसा माझ्यावरही विश्वास टाका. मी नवीन आहे, पण साहेब व दादांसारखे काम करून दाखवील अशी ग्वाही   मावळचे उमेदवार पार्थ अजित  पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड येथी प्रचार सभेत पार्थ यांनी पहिले जाहीर भाषण केले. त्यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी दाद दिली.

पार्थ पवार यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत पहिलीच प्रचार सभा पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसेपाटील, मदन बाफना, आमदार बाळाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पार्थ पवार यांनी आपले पहिले भाषण केले. देश महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी या अडचणीतून  जात असल्याचे सांगत या  शासनाने  काहीच कामे केले नसल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला. युपीए शासनाच्या काळात अनेक विकास कामे झाले होती ते जनतेपर्यंत  पुन्हा पोहचविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जो बारामतीत व पिंपरी चिंचवडमध्ये विकास झाला आहे. तो मावळ लोकसभा मतदारसंघात करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पार्थ पवार यांनी यावेळी सांगितले. अर्थात जेष्ठ नेते,आपणसारख्या कार्यकर्त्याच्या पाठिंब्याच्या बळावर . हे माझे पहिलेच भाषण आहे आणि तेही साहेबांसमोर करीत असल्याचेही पार्थ यावेळी म्हणाले. साहेब, दादा तसेच पक्ष व आपण सर्वांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची जी जबाबदारी दिली ती यशस्वीपणे पार पाडील अशी ग्वाही त्यांनी दिली.