शिवसेनेकरीता   भाजप दोन पाऊल.. पुढे

युती धर्म पाळण्याकरीता भाजप कार्यकर्ते सरसावले 

श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा पनवेलमध्ये जोर वाढला 

पनवेल/प्रतिनिधी- मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार निवडणुक रिंगणात असल्याने या ठिकाणीची लढाई हाय व्होल्टेज  राहणार आहे. घाटमाथ्यावर नाराजी नाटय सुरू असताना पनवेल, उरण व कर्जत या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने युती धर्म पाळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रविवारी पनवेलमध्ये  पार पडलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात भाजप दोन पावले पुढे असल्याचे दिसून आले.

मावळ लोकसभा मतदारसंघ गेली दहा वर्ष शिवसेनेकडे आहे. मात्र यावेळी शेकापबरोबर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने थेट पार्थ पवार यांना निवडणुक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे मावळची लढाई ही हायहोल्टेज होणार हे स्पष्ट झाले आहे. पार्थ पवार यांनी पनवेलसह उरण आणि कर्जतमध्ये प्रचाराच्या दोन फेऱ्या पुर्ण केल्या आहेत. एकंदरीत पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराने जोर धरला आहे. रविवारी त्यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत दौरा केला. यावेळी शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. तळोजा, खारघर, कामोठे, नवीन पनवेल आणि पनवेलमध्ये पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्याच्या सभा पार पडल्या यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक दिसले. त्यांनी केंद्र व राज्य शासनाने केलेल्या कामांचा आढावा घेत असताना श्रीरंग बारणे यांच्या कार्याचा गौरव केला. त्याचबरोबर आ. ठाकूर विरोधकांवर हल्लाबोल केला. एकिकडे आपले उमेदवार श्रीरंग बारणे हे सलग पाच वेळा संसदरत्न झाले. आणि दुसरीकडे समोरच्या उमेदवारीचा  पाटी कोरी आहे. मात्र त्या  पाटीवर  भ्रष्टाचाराचा इतिहास लिहलेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा कित्ता  गिरविण्याची संधी मावळमधील मतदार त्यांना देणार का असा प्रश्न विचारला पाहिजे. यांचे जुलुम  कसे सहन केले.भ्रष्टाचाराचे डोंगर आणि पर्वत कसे उभे केले! यांना आता  वर डोके काढून देता काम नये असे जनताच समोरून  सांगेल या शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांवर  प्रहार करीत युतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवडूण देण्याचे आवाहन केले. कामोठे येथील सभेला माजी खासदार रामशेठ ठाकूर सुध्दा उपस्थितीत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हापरिषद गटनिहाय  मंगळवारी मेळावे 

मंगळवारी जिल्हा परिषद मतदार संघनिहाय नेरे, कोन आणि उलवा नोड येथे कार्यकर्ता मेळावे होणार आहेत. सकाळी १० वाजता नेरे येथील सन्मित्र गणेश मंडळाच्या सभागृहात पहिला मेळावा पार पडणार आहे. त्यानंतर कोन व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेळावे होणार आहेत.  यावेळी खासदार  श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील , भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत