गुलाबराव करंजुलेंच्या हातात कमळ

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत केला भाजप प्रवेश

अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

कल्याण/प्रतिनिधी- अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले यांनी सोमवारी कल्याणमध्ये  भाजमध्ये  प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले .यामुळे अंबरनाथ- बदलापुर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

प्रसिध्द उदयोजक म्हणून ओळखलेले जाणारे गुलाबराव करंजुले यांनी अंबरनाथ नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भुषवले आहे. अंबरनाथ, बदलापुर तसेच मुरबाड परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड केली होती. मात्र राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करंजुले यांनी आपल्या समर्थकासंह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला . त्यांचे पुत्र अभिजित करंजुले हे सुध्दा  राजकारणात सक्रीय आहेत. त्यांची युवक वर्गात मोठी क्रेझ असून तरूणांची मोठी फळी तयार केली आहे .अंबरनाथच्या राजकारणात मोठे प्रस्त म्हणून करंजुले यांची ओळख आहे.सोमवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार किसन कथोरे यांच्यासह युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

करंजुले यांचा पारनेर भाजपलाही फायदा

गुलाबराव करंजुले यांचे मुळ गाव पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव आहे. त्यांनी आपल्या जन्मगावात प्रति जेजुरी उभी केली आहे. त्यांची गावकडील मातीशी नाळ जोडली गेली आहे त्यामुळे  अगामी काळात पारनेर तालुक्यात गुलाबराव करंजुले यांचा फायदा भाजपला  होवू शकतो असे मत राजकिय जाणकरांनी नोंदवले आहे.