सभागृहात फुले नव्हे तर शब्द उधळणारा खासदार हवा!

प्रकाश आंबेडकर यांची युती –आघाडीवर चौफेर टीका

वंचित आघाडीची उरण येथे प्रचाराची सांगता

उरण/प्रतिनिधी: मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच घाटाखालील  स्थानिकांना राजाराम पाटील यांच्या रूपाने प्रतिनिधित्व मिळाले आहे. एकीकडे युतीकडून तेच उमेदवारी आहेत. तर दुसरीकडे वयाप्रमाणे फुले उधळणारे आहेत आपल्याला सभागृहात फुले नव्हे तर शब्द उधळणारा उमेदवार हवा असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी पार्थ पवार यांचे नाव न घेता लगावला. शनिवारी उरण येथे वंचित बहुजन आघाडी ची प्रचाराची सांगता सभा झाली त्यावेळी आंबेडकर बोलत होते

या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी आणि पार्थ पवार यांना  लक्ष केले.आपण जर समोरच्या उमेदवाराला निवडून दिले. तर सभागृहा बरोबरच उरणला  फुले उधळत जातील असा चिमटाही आंबेडकर यांनी काढला. आपण त्या संस्कृतीचा कधीच पुरस्कार केला नाही. ती  आपली संस्कृती कधीच झाले नाही. अशा उमेदवाराला आपण निवडून दिलेले तर आ बैल मुझे मार अशी परिस्थिती निर्माण होईल असा आरोपही त्यांनी केला. यानिमित्ताने तरी नवीन पिढीचे चारित्र्य बाहेर निघाले असल्याचा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला पाच वर्ष कोणाच्या हातात द्यायची. वाट लावणारे आहेत त्यांना बाजूला ठेवून राजाराम पाटील पाटील सारखे उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात एक तरी चांगले काम केले आहे का? असेल तर त्यांनी सांगावे असे खुले आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिले. तिकडे ते सांगतात दहशतवादाच्या विरोधात लढतोय. आणि दुसरीकडे प्रज्ञा साधवी यांना मध्यप्रदेश मधून उमेदवारी दिली जाते नेमकी ची भूमिका काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देशाचा पैसा रिलायन्स कसा जाईल इतकेच काम गेल्या पाच वर्षात झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. कोकणाचे वाटोळे करण्याचे काम या दोन्ही सरकारने केले आहे. एसईझेडच्या नावाखाली जमिनी लाटण्याचे काम या मंडळींनी केले. या अगोदर दि. बा पाटील आणि आत्ता उल्का महाजन लढा देत आहेत. तुम्ही आमच्या हातात सत्ता द्या या जमिनी परत केल्या शिवाय  गप्प बसणार नाही अशी ग्वाही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिअर मध्ये चाललेली गाडी रिव्हर्स गिअर मध्ये आणली. आता ती उचलत नाही. त्यामुळे तुम्हाला या देशातील जनतेने आठवणी ठेवायचे तरी कसे असाच प्रश्न आंबेडकर यांनी शासनाला विचारला.

उमेदवार राजाराम पाटील यांनी सांगितले . सर्वसामान्यांना जमीन, घर, पाणी या मूलभूत गोष्टीपासून गेली सत्तर वर्ष दूर ठेवण्यात आले. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर वंचितांचे प्रश्न सोडवले गेले नाही. त्यामुळे आपला विकास झाला नाही. त्याला तोडगा म्हणून आगरी कोळी, माळी ,भंडारी समाज आज वंचित आघाडी कडे वळला आहे. प्रकाश आंबेडकर, आणि खासदार ओवी शी यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या माध्यमातून या भागातील वंचितांचे प्रश्न मार्गी लावल्या शिवाय गप्प बसणार नसल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. वंचित बहुजन आघाडीचे नेते , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खोपोलीच्या सभेलाही उस्फूर्त प्रतिसाद

तत्पूर्वी खोपोली येथेही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा घेतली. या सभेला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून मोठी गर्दी जमली होती. याठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना-भाजप महायुती तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीवर चौफेर हल्ला चढवला.