शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव

 छत्रपती संभाजी राजे,  पंकजा मुंडे, गणपतराव देशमुख उपस्थित राहणार
प्रा.राम  शिंदे महोत्सवाचे स्वागताध्यक्ष
अहमदनगर प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 294 वा  जयंती महोत्सव शुक्रवारी 31 मे रोजी त्यांच्या चोंडी या जन्मस्थळ आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला खासदार छत्रपती संभाजी राजे, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे – पालवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महोत्सवाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री प्रा. राम शिंदे भूषवणार आहेत
सालाबाद प्रमाणे यावर्षीही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव चोंडी या ठिकाणी साजरा होत आहे. कार्यक्रमाचे नियोजना करीता नुकतीच पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. 31 मे रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी विरोधी पक्ष नेते  राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, खासदार डॉक्टर विकास महात्मे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अरुण जगताप, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, राहुल जगताप, संग्राम जगताप, भाऊसाहेब कांबळे, वैभव पिचड, रामहरी रुपनवर, राम वडकुते, नारायण पाटील, दत्तात्रय भरणे, अनिल गोटे, माजी आमदार ना. धो. महानोर, प्रकाश शेंडगे, हरिदास भदे, रमेश शेंडगे, पोपटराव गावडे, नानाभाऊ कोकरे, विजय मोरे, अनंत कुमार पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. जयंती महोत्सवाला  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.