रायगड जिल्हा नियोजन समितीवर तेरा नवीन सदस्यांची नियुक्ती

दोन नामनिर्देशित अकरा विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश
भाजप, शिवसेना व आरपीआय  मिळाले सदस्यत्व 
पनवेल/ प्रतिनिधी: रायगड जिल्हा नियोजन समितीवर एकूण तेरा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या नियोजन विभागाने गुरुवारी या प्रस्तावाला 
मंजुरी दिली. यामध्ये दोन नामनिर्देशित आणि 11 विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय या महायुतीतील घटक पक्षांतील   नेत्यांना जिल्हा नियोजन समितीवर  संधी देण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समितीत  जिल्ह्यातील विविध विकास कामांचे नियोजन केले जाते. या ठिकाणी मंजुरी मिळाल्याशिवाय शासनाचा निधी खर्च करता येत नाही. जिल्हा नियोजन समितीचे  पालकमंत्री अध्यक्ष असतात. जिल्हाधिकारी सदस्य  सचिव म्हणून काम करतात. जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे सदस्य असतात. याव्यतिरिक्त जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या दोन व्यक्तींची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते. रायगड जिल्हा नियोजन समितीत  कर्जत खालापूर चे माजी आमदार देवेंद्र साटम आणि सतीश धारप दोघांचे नामनिर्देशन सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील रहिवासी असलेल्या अकरा व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून नियोजन समितीवर नियुक्तीस   शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, ऍड महेश मोहिते, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे राजू अशोक साबळे, आरपीआयचे कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड, विष्णू हरी पाटील, जयवंत दळवी, कृष्णा कोबनाक, आत्‍माराम शंकर पाटील, जगदाश कृष्णा ठाकूर, महादेव चांगु पाटील यांचा  समावेश आहे. यामध्ये पनवेल, पाली , मुरुड, महाड,  म्हसळा, खालापूर, पेण या तालुक्यांना संधी देण्यात आली आहे.