शुक्रवारी दहावीच्या गुणपत्रिकांचे वाटप

पुणे /प्रतिनिधी
मार्च २०१९ मध्ये आयोजित माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ . १० वी ) परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख याचे वाटप शुक्रवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता विभागीय मंडळामार्फत करण्यात येणार आहे .त्याच दिवशी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाचे वाटप शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे.