बारडगाव- सुद्रिकची नळ पाणीपुरवठा योजना मंजुर

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग कडून प्रशासकीय मान्यता
पारखे – काळे आणि गावडे वस्ती वरही येणार नळाचे पाणी
पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
कर्जत/ प्रतिनिधी -: प्रा. राम शिंदे यांनी कर्जत – जामखेड मतदारसंघांमध्ये विकासकामांचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील रस्त्यांसाठी सुमारे आठ कोटी रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहेच. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक – पाटील – पारखे , आणि गावडे वस्ती करिता ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतले आहे. सोमवारी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने या योजनेचा आराखडा व खर्चास हिरवा कंदील दाखवला आहे.
कर्जत तालुक्यातील बहुतांशी गावे ओलिताखाली आणण्याच्या उद्देशाने तुकाई चारी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रा. राम शिंदे यांना मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर कर्जत मधील बऱ्याच गावांमधील दुष्काळ निवारण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर बारडगाव सुद्रिक – पाटील या गावातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना आखण्यात आली. परंतु याचा खर्च विहित निकषांपेक्षा जास्त असल्याने अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी हा प्रस्ताव शासनाच्या मान्यते करीता सादर केला होता . तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून तांत्रिक मंजुरी घेण्यात आली. दरम्यान हे योजना मार्गी लागावी यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठपुरावा केला. आणि या योजनेला प्रशासकीय मंजुरी देण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. त्या अनुषंगाने 24 जून रोजी बारडगाव सुद्रिक – पाटील – पारखे वस्ती व काळे -गावडे वस्ती नळ पाणीपुरवठा योजनेला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
सदर योजना जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर
ही पाणीपुरवठा योजना एक वर्षाकरिता ठेकेदार चालवणार आहे. याअंतर्गत घरगुती नळाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
48 लाख रुपये खर्च अपेक्षित
मौजे बारडगाव – सुद्रिक ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना करतात 47 लाख 89 हजार इतका खर्च अपेक्षित आहे. या योजने साठी तयार करण्यात आलेला आराखडा व अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. लवकरच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निविदा प्रसिद्ध करून ठेकेदार नियुक्त केला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. योजना पूर्णत्वास आल्यानंतर येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.