खुटारी रा .जि. प शाळा   सलग दुसऱ्यांदा ठरली स्कॉलर   

तन्मय रविंद्र म्हात्रे तालुक्यात पहिला
सात विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण
पनवेल/प्रतिनिधी  रायगड जिल्हा परिषदेची ज्ञानरचनावादी डिजिटल शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुटारी शाळेच्या 2 विद्यार्थ्यांना शिष्युवृत्ती मिळाली आहे. तर तन्मय रविंद्र म्हात्रे हा विद्यार्थी पनवेल तालुक्यात प्रथम आला आहे. शाळेचे एकूण सात विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीही याच शाळेची विद्यार्थिनी पनवेल मध्ये प्रथम तर रायगड जिल्ह्यात तिसरी आली होती. शाळेने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
शिक्षण विभागाकडून विदयार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरीता शिष्युवृत्ती परिक्षा घेतली जाते. यामाध्यमातून विदयार्थी स्पर्धेत उतरतात त्याचबरोबर या परिक्षेच्या अनुषंगाने सामान्य ज्ञानातही भर पडते.भविष्यात वेगवेगळया स्पर्धात्मक परिक्षेला सामोरे जावे लागते. त्याकरीता शालेय जीवनातच त्यांचा सराव व्हावा तसेच मुलींच्या बुध्दीमत्तेची एक प्रकारे तपासणी व्हावा या उद्देशाने पुर्वी चौथी आणि सातवीच्या विदयार्थ्यांसाठी शिष्युवृत्ती परिक्षा घेतली जात असे. आता ती पाचवी आणि आठवीचेच विदयार्थी या परिक्षेला बसतात. राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्याच्या  धर्तीवर ही परिक्षा असते. मराठी आणि गणीत तसेच बुध्दीमत्ता व इंग्रजी असे दोन तीनशे गुणांचे पेपर असतात. या परिक्षेत सर्व शाळांचे विदयार्थी बसतात. आपले शाळेतील मुले गुणवत्ता यादीत यावेत याकरीता खाजगी शाळा सुध्दा प्रयत्न करतात. त्याचबरोबर पालक खाजगी क्लासेस सुध्दा लावतात. फेब्रुवारी 2018मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत  रायगड जिल्हा परिषदेच्या खुटारी शाळेतील त्यात विदयार्थी  बसले होते.त्यापैकी सर्वजण उत्तीर्ण झाले तसेच तन्मय आणि प्रेम गणेश तांगडे या दोन जणांना शिष्युवृत्ती भेटली आहे. या शाळेचे तत्कालीन शिक्षक  संजय वसंत खटके यांनी यश संपादन केलेल्या विदयार्थ्यांची तयारी करून घेतली. दोन वर्ग सांभाळून त्यांनी या परिक्षार्थींकडून  शंभरपेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या. सुट्टीच्या दिवशी त्याचबरोबर शाळेच्या वेळानंतर थांबून खटके यांनी या मुलांची तयारी करून घेतली.  विशेष म्हणजे यामध्ये काही विद्यार्थी हे बिगर मराठी भाषिक आहेत. तरीसुद्धा त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत आपला प्रभाव पाडला.
शिष्युवृत्ती परीक्षेला बसलेले विद्यार्थी
तन्मय रविंद्र म्हात्रे २)प्रेम गणेश तांगडे ३)सेजल सतीश म्हात्रे ४)रिद्धी केशव रुपेकर ५)आदर्श मनोज निर्मळ ६)आयुष हालेश पाटील ७)महेंद्र त्रिवेणीप्रसाद विश्वकर्मा
  तन्मय नवोदयच्या यादीतही झळकला
  या शाळेच्या तन्मय म्हात्रे याने स्कॉलरशिप मध्ये तर नंबर काढला. त्याचबरोबर केंद्रीय नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत सुद्धा  बाजी मारली. यासाठीही संजय खटके यांनी तयारी करून घेतली होती.