मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात

दोन ट्रकचा समावेश, एक वाहन चालक गंभीर जखमी
पनवेल प्रतिनिधी: – मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना गुरुवारी सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल जवळ दोन ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एक  चालक गंभीर जखमी झाला असून त्याला कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी पहाटे पाच वाजता मुंबईकडून पुणे बाजूकडे एक मोठा लाईनवरचा  ट्रक उजव्या लेनवरून  चालला होता . त्यावेळी पनवेल जवळील आदई गावच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरात धडक दिली. त्यामुळे ही दोन्ही वाहने महामार्गाच्या दुभाजकाला जाऊन धडकले. त्यामध्ये पाठीमागील ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. आत मध्ये असलेले ड्रम महामार्गावर विखुरले होते. दरम्यान त्या ट्रक मधील चालक गंभीर रित्या जखमी झाला आहे. आय आर बी, आणि रस्ते विकास महामंडळाच्या शीघ्र बचाव पथकाने संबंधित जखमी ट्रक चालकाला बाहेर काढून त्याला उपचार करण्यासाठी कामोठा एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पुढचा ट्रकचा चालक हा किरकोळ जखमी झाला आहे.