दोन हजारांच्या लाचेत अडकला खालापूर चा हवालदार

रायगड अँटी करप्शनचा यशस्वी ट्रॅप
अधिकराव पोळ यांनी धडाकेबाज कामगिरी चे खाते उघडले
खालापूर /प्रतिनिधी: – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या   रायगड कार्यालयाची जबाबदारी घेतल्यानंतर पोलीस उपधीक्षक अधिकराव पोळ यांनी मंगळवारी पहिला यशस्वी ट्रॅप केला. खालापूर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
विश्वनाथ विठोबा म्हात्रे (50) असे लाच घेतलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रार यांच्याविरोधात खालापूर पोलीस ठाणे येथे दाखल तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी संबंधिताने दोन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार संबधिताने  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडे म्हात्रे यांच्या बाबत तक्रार केली होती. त्यानुसार उपधीक्षक अधिकराव पोळ, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस हवालदार बळीराम पाटील, विश्वास गंभीर, विशाल शिर्के, कौस्तुभ मगर, निशांत माळी, अरुण घरत यांनी सापळा रचला. संबंधिताने पंचायत समक्ष लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. कोणत्याही शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास अँटी करप्शन ब्युरो रायगड अलिबाग यांच्याकडे 02141 – 222331 , टोल फ्री – 1064 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपाधीक्षक अधिकराव पोळ यांनी केले आहे. त्याचबरोबर अधिकराव पोळ-9594613444,किरणकुमार बकाले-7350750850