फोडलेल्या डोंगराला फुटला पाझर

महात्मा फुले कॉलेज जवळ नवीन धबधबा
चंद्रशेखर भोपी
पनवेल पांडवकडा, गाढेश्वर हे पनवेल तालुक्यातील प्रमुख पावसाळी पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. दिवसेंदिवस या  परिसरात नवनवीन ठिकाण पर्यटकांना आकर्षित करून घेत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित झालेल्याचे पुनर्वसनसाठी   महात्मा फुले महाविद्यालय जवळील डोंगर फोडण्यात आला आहे. आणि याच ठिकाणी वरतून पावसाचे येणारे पाणी धबधब्यासारखे खाली कोसळत असल्याने अनेक जण त्याठिकाणी भिजण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.