कार्यतत्पर नगरसेविका

लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे काम हे लोकप्रतिनिधी करीत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थानमध्ये काम करताना मोठा जनसंपर्क सांभाळावा लागतो. नागरिकांच्या छोट्या छोट्या प्रश्नांची सोडवणूक करावी लागते. वॉटर, मीटर गटर या महत्वाच्या  समस्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागतो. थेट लोकांशी दररोज संपर्क येत असल्याने मोठी जबाबदारी पार पाडावी लागते. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जावे लागते. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपलेपणाची भावना जागृत करावी लागते. एकंदरीतच 24 तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहावे लागते. या सर्व बाबी सांभाळणारी  व्यक्ती  खऱ्या अर्थाने  लोकप्रतिनिधी ठरते. कळंबोलीत गेल्या दोन वर्षात नगरसेविका म्हणून ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. अशा मोनिकाताई प्रकाश महानवर यांनी पक्षाने दिलेल्या संधीच एक प्रकारे सोने केला आहे. सुशिक्षित असलेल्या मोनिका वहिनींनी नागरी समस्यांच्या सोडवणूकी वर भर दिला. त्याचबरोबर आपल्या प्रभागात पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा केला. अंतर्गत रस्त्यां करिता सिडको प्रशासनाकडे पञ प्रपंच केला. गटारांच्या दुरुस्तीसाठी सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याशिवाय कळंबोलीत राहणाऱ्या माथाडी कामगारांच्या हातांना काम मिळावं यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. विविध सामाजिक उपक्रम मोनिकाताईनीं राबवले. पनवेल महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या विषयांबाबत त्यांचा पाठपुरावा अखंडितपणे सुरू आहे. कळंबोली च्या बाजूने जाणाऱ्या महामार्गावर भेडसावणाऱ्या समस्या बाबत त्यांनी आवाज उठवला. त्यांच्या कामाची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी नुकतीच वर्णी लावली आहे. सामाजिक बांधिलकी जपत मोनिकाताई महानवर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये टँकर सुरू करून मोफत पाणीपुरवठा केला. यासारखी अनेक कामे मोनिका ताईंच्या खात्यात जमा झालेले आहेत. वास्तविक पाहता कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी दोन वर्षातच राजकारण आणि समाजकारणात आपला ठसा उमटवला आहे. अर्थात पती प्रकाश महानवर व दीर रामदास महानवर यांचे पाठबळ त्यांच्या पाठी कायमच राहिले आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्श विचारांवर मार्गक्रमण करीत असलेल्या मोनिका वहिनींचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना ऑनलाईन बातमी च्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा