पणन मंत्र्यांची  ही पावले चालले पंढरीची वाट

कर्जत -जामखेड च्या विविध पायी दिंडींना  प्रा. राम शिंदे यांची भेट
वारकऱ्यांना केले,आरती संग्रह, हरिपाठाचे वाटप
ठिकाणी पडल्या अन्नदानाच्याही  पंगती
नाना करंजुले 
अहमदनगर /प्रतिनिधी. पंढरीची वारी म्हटलं का लहान-मोठे, सर्वसामान्य ,उच्चपदस्थ,  हे सर्वजण समान असतात, कारण प्रत्येकाची पावले ही  पंढरीची वाट चालत असतात. बुधवारी राज्याचे पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा अहमदनगर चे पालकमंत्री प्रा .राम शिंदे सुद्धा जामखेड आणि कर्जत तालुक्यातील विविध दिंडयामध्ये  सहभागी झाले. आपले दौरे, सभा, बैठका या सर्व गोष्टी बाजूला ठेवत ते वारकऱ्यांशी समरस झाले. विठ्ठल नामाच्या स्मरणात  देहभान झाले. इतकेच नाही तर प्रा. शिंदे यांनी आरती संग्रह आणि हरिपाठाचे वाटप केले. त्याचबरोबर त्यांनी ठिक ठिकाणी अन्नदानाच्या पंक्ती ही पाडल्या.
पंढरीचा विठ्ठल  महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. पांडुरंगा चरणी लीन होणारे लाखो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पायी वारीने  पंढरी नगरी गाठतात. आणि आपल्या विठुरायाचे मनोभावे दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागतात. आषाढी एकादशीच्या जवळपास एक महिना अगोदरच पायी दिंडीने सुरुवात होते. लाखो भाविक पायी चालत हरी नामाचा जप करतात.
 कर्जत-जामखेड परिसरातील चिलवडी , मोहिते वस्ती राशिन, हळगाव, मुंजाबा गल्ली, आरणगाव,  या गावांमधून पायी दिंड्या निघतात. या दोन्ही तालुक्यातून हजारो भाविक पंढरीची वारी करतात. दरवर्षाप्रमाणे यंदाही या गावातून पायी दिंड्या पंढरपुराकडे रवाना झाल्या. बुधवारी राज्याचे पणन व वस्त्रोद्योग मंत्री  तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी या सर्व दिंड्यांना भेट दिली. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या हातात भगवा पताका घेत वैष्णवांचा मेळया चा अनुभव घेतला. हातात टाळ आणि वीणा घेऊन त्याने पंढरीच्या विठ्ठलाचे नामस्मरण केले. त्यांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. गेल्या काही दिवसापासून पंढरीची वारी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून महाप्रसादाचा आनंद घेतला. भजन, कीर्तन व प्रवचन श्रवण केले. प्रा .शिंदे यांच्या वतीने आरती संग्रह,श्री ज्ञानदेव हरिपाठ वाटप करण्यात आले.  यावेळी ह.भ.प.शिंदे, रामकृष्ण शरणज , दादा  रंधवे, महादेव रासकर, रणजीत महाराज, ह.भ.प.जमधाडे  उपस्थित होते. प्रा. राम शिंदे विधानसभेत आपले लोकप्रतिनिधित्व सक्षम पणे करीत असताना. दुसरीकडे  मंत्रीपदाचा शिष्टाचार बाजूला ठेवत ते वारकरी संप्रदायामध्ये एकरूप झाल्याने हजारो वारकरी बंधू आणि बांधवांनी समाधान व्यक्त केले. सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा प्रा. शिंदे यांनी दिल्या व  राम कृष्ण हरी म्हणत सर्वांचा मनोभावे  निरोप घेतला.यामाध्यमातुन  त्यांनी विविध पायी वाऱ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना एक प्रकारे जिंकून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.