राज्याच्या पणन मंत्र्यांनी केली शेतात पेरणी

प्रा. राम शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
जामखेड /प्रतिनिधी. दुपारची वेळ, जामखेड च्या रस्त्यावर वाहनांचा ताफा जात असताना अचानक बाजूला थांबला. पाहताय तर काय राज्याचे पणन व वस्त्र उद्योग मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे खाली उतरले. आणि धडक पणे शेतात गेले. तिथे हजारे कुटुंबीय पेरणी करत होते. पणन मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केलीच, पण एका हातात बैलांचा कासरा, आणि दुसऱ्या हाताची मुठ पाभारीच्या चाड्यावर ठेवत त्यांनी चक्क पेरणीला सुरुवात केली. इतकेच नाही तर कसलेल्या शेतकऱ्या प्रमाणे प्रमाणात  बियान त्यामध्ये टाकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. प्रा. शिंदे यांनी या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर आपण मंत्री जरी असलो तरी या मातीशी नाळ कायम असल्याचे अनुभूती येथील बळीराजाला दिली.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथील मूळ रहिवासी असलेले प्रा .राम शिंदे हे शेतकरी कुटुंबात जन्मलेले आहेत. त्यामुळे नांगरणी, पेरणी, मळणी ही शेतातले कामे, तसेच  पाभार, फराट, कुळव, कोळपे, हे अवजारे त्यांना  ज्ञात आहेत. माध्यमिक, उच्च माध्यमिक त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या आई-वडिलांना शेती कामात कायम मदत केल्याचे समस्त चोंडी कर साक्षीदार आहेत. शेतीची त्यांना कमालीची आवड आहे. त्याचाच प्रत्यय शुक्रवारी रस्त्याच्या कडेला शेतात पेरणी करणाऱ्या हजारे कुटुंबीयांना आला. पणन मंत्र्यांनी आपला सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत थेट हजारे यांच्याशी हितगूज साधले. पावसाचे प्रमाण, त्याचबरोबर वेगवेगळी पिक, त्यांचा बाजार भाव बैल जोडीच्या किंमती  या विविध गोष्टींवर त्यांनी चर्चा केली. त्या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. शुक्रवारी आषाढी एकादशी च्या निमित्ताने “महाराष्ट्रात पुरेसा पाऊस पडू दे  आणि बळीच राज्य येऊ दे!” अशी प्रा.राम शिंदे यांनी  विठ्ठलाकडे   प्रार्थना केली. नंतर येथील शेतकरी हजारे यांचा निरोप घेत पुढील नियोजित दौऱ्या करता ते पुढे निघून गेले. गेली दोन टर्म कर्जत -जामखेड चे नेतृत्व करणारे प्रा. शिंदे हे  राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. असे असतानाही त्यांचा आपल्या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. रस्त्याने चालणारे, शेतात राबणारे दिसता क्षणी आपल्या वाहनांचा ताफा थांबून त्यांच्याशी हितगुज करणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. अनेकदा   शेतात जाऊन निहारी केल्याची अनुभूती अनेकांना आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.