बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यपदाचा कार्यभार स्विकारला

मावळते अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोपवला पदभार

मुंबई/प्रतिनिधी- माजी महसुल मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा पदभार गुरूवारी मावळते अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडून स्विकारला. चव्हाण यांनी थोरात यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यातील काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

काही दिवसापुर्वी प्रदेशाध्यक्षपदाकरीता बाळासाहेब थोरात यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आज त्यांनी टिळक भवन येथे पदाचा कार्यभार घेतला. कार्यकर्त्यांनी हात तुरे आणून नयेत असे आवाहन त्यांनी केले होते. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर, कार्याध्यक्ष नितीन राऊत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, सचिन सावंत. कृपाशंकर सिंह यांच्यासह नेते पदाधिकारी उपस्थित होते. जबाबदारीच्या भावनेतून मी व माझे सहकारी यापुढील काळात महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने संघर्ष करू अशी ग्वाही थोरात यांनी यावेळी दिली.