शहर प्रमुख अच्युत मनोरे यांना मातृशोक

आशा सुदंन मनोरे यांचे निधन
पनवेल/ प्रतिनिधी:- शिवसेनेचे पनवेल शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक अच्युत मनोरे यांच्या मातोश्री आशा सुदंन मनोरे यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्या 86 वर्षांच्या होत्या. माई नावाने परिचित असलेल्या आशा मनोरे त्यांच्या पाठीमागे अच्युत यांच्यासह दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून प्रभू आळी येथे वास्तव्यास असलेले मनोरे कुटुंब हे सामाजिक क्षेत्रात अग्रभागी आहे. माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे पनवेल शहर प्रमुख अच्युत मनोरे यांची सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे, प्रामाणिकपणे समाजाची सेवा करणे ही शिकवणूक माईंनी आपल्या मुलांना दिले होते. त्यानुसार अच्युत जनतेची  सेवा करीत आहेत.कुटुंबवत्सल त्याचबरोबर सर्वांना आपलेसे करण्याचा आशा मनोरे यांचा स्वभाव होता. अल्पशा आजाराने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. दुपारी साडेबारा वाजता माईंच्या पार्थिवावर अमरधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच पनवेल परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी मनोर यांच्या निवासस्थानी जाऊन माईंचे अंत्यदर्शन घेतले. ऑनलाईन बातमी कडून आशा मनोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली