अंबरनाथच्या अत्याधुनिक महाजनादेश रथाने प्रदेश भाजपाचे लक्ष वेधले

मुख्यमंत्री व  प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन
गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या संकल्पनेचा गौरव

मुंबई  /प्रतिनिधी अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांच्या भाजप प्रवेशाने या विधानसभा मतदार संघात पक्षाची ताकद वाढली आहे. करंजुले यांच्या संकल्पनेनुसार भाजप सदस्य नोंदणी करता अत्याधुनिक स्वरूपाचा महा जनादेश रथ तयार करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात गोरेगाव येथे करण्यात आले. या हायटेक र थाने प्रदेश भाजपाचे लक्ष वेधून घेतले. गेल्या काही महिन्यात गुलाबराव करंजुले यांनी पक्षवाढीसाठी घेतलेली मेहनत व परिश्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कौतुक करीत त्यांचा सन्मान केला.

संपुर्ण राज्यभरात भाजप सदस्य नोंदणी व मतदार नोंदणी अभियान सुरू आहे. अंबरनाथ विधानसभा मतदार संघात भाजपचे गुलाबराव करंजुले, युवानेते विश्वजीत व अभिजीत करंजुले यांच्या संकल्पनेतून तसेच राज्यमंत्री रविंद्र चव्हाण व कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत अत्याधुनिक यंत्रणा असलेला सुसज्ज असा रथ तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये सदस्य नोंदणीसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हायटेक स्वरूपाची यंत्र नाही बसवण्यात आले आहे. या भाजप सदस्य व मतदार नोंदणी अभियान महाजनादेश रथाचे उद्घाटन करण्यात आले.पक्षाच्या विस्तारीत राज्य कार्यकारिणीची बैठक रविवार 21 रोजी गोरेगाव येथील नेस्को संकुलात पार पडली. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम पार पडला.या प्रसंगी अंबरनाथ शहरातुन भाजप गटनेते तुळशीराम चैधरी, विधानसभा अध्यक्ष डाॅ. मनोज कंदोई, शहर सरचिटणीस राजेश कौठाळे, दिलीप कणसे, उपाध्यक्ष दिपक कोतेकर, व्यापारी अध्यक्ष खानजी धल, विश्वास निंबाळकर, युवा मोर्चो प्रदिप गुप्ता, प्रल्हाद पाटील, संतोष वंदाल, बळीराम पालांडे, श्रीकांत रेड्डी, अझर कुरेशी उपस्थित होते.

या मान्यवरांनी रथाला भेट देऊन कौतुक केले
गुलाबराव करंजुले-पाटील व अभिजीत करंजुले-पाटील यांनी निर्माण केलेल्या संघठन पर्व सदस्यता अभियान रथाला मान्यवरांनी भेट दिली .  प्रदेश भाजप संघठनमंत्री विजयराव पुराणीक, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, केद्रीय उपाध्यक्ष श्याम जाजु, विनय सहस्त्रबुध्दे, विधानसभा अध्यक्ष हरिभाउ बागडेे, महाराष्ट्र् राज्याचे अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, गृहनिमार्णमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, संभाजीराव पाटील-निलंगेकर, अहमदनगर चे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, मंत्री बाळासाहेब भेगडे, गृहराज्य मंत्री रणजित पाटील मंत्री प्रविण पोटे, गोदिंयाचे पालकमंत्री परिणय फुके, माजीमंत्री हंसराज आहीर, खासदार कपिल पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार सुजय विखेपाटील, खासदार अमर साबळे, माजी खासदार किरीट सोमया, खासदार सुनिल मेढे, जेष्ठनेते आ. एकनाथ खडसे, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंग ठाकुर, युवक प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, खासदार हिना गावीत, आमदार संजय केळकर, माजी मंत्री प्रकाश मेहता, माजीमंत्री बबनराव पाचपुते, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकुर, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे, आमदार स्मिताताई वाघ, आमदार देवयानी फरांदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार संतोष दानवे, माजी आमदार कुमार आयलानी, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, महाराष्ट्र् युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव आव्हाड, कल्याण जिल्हा विस्तारक शंशीकांत कांबळे आदी यामध्ये समावेश होता.