वि खं. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलेचा श्री गणेशा

कार्यशाळेत बनवले शाडूच्या मातीचे गणपती
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटरचा
इकोफ्रेंडली उपक्रम
चंद्रशेखर भोपी
पनवेल /प्रतिनिधी: – सर्रासपणे प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणपती बनवले जातात. त्याचे विसर्जन तलाव तसेच समुद्रात केल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. याला पर्याय म्हणून शाडू द्वारे तयार केलेल्या बाप्पांच्या मूर्ती होय. त्याच अनुषंगाने वि खं विद्यालयातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटरच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. याकरीता खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येते. यापैकी बहुतांशी मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिस ने बनवल्या जातात. वास्तविक पाहता पीओपी मुळे पाणी दूषित होते. त्याचा परिणाम जलचरांवर सुद्धा होतो. एकंदरीतच ही बाब पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे. दरम्यान पनवेल परिसरात इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हावा या अनुषंगाने अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तीने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये रोटरी क्लब अग्रभागी आहे. गणेश विसर्जनासाठी रोटरी क्लबच्या वतीने कृत्रिम तलाव तयार करून त्या ठिकाणी विसर्जन करण्याचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला. दरम्यान रोटरी क्लब पनवेल सेंट्रल ने वि .खं विद्यालयात शाडूच्या मातीचे द्वारे श्रीगणेशाच्या मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. शाडू पाण्यात विरघळते त्याचा कोणताही परिणाम होत नाही. अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक कार्यशाळा घेण्यात आली.  शाळेचे मुख्याध्यापक पी बी ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  यामध्ये180 विद्यार्थी सहभागी झाले होते. दोन विद्यार्थी मिळून एक गणपती बाप्पा बनवण्यात आला. यासाठी  त्यांना बियाणे युक्त शाडूच्या माती चे वाटप  करण्यात आले. 40 ते 45 सुबक गणपती बाप्पा या विद्यार्थ्यांनी बनविले. या कार्यशाळेत इरा आर्टस् च्या रुपाली मदन व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना गणेश मूर्ती बनविण्यासाठीचे शिक्षण दिले. शाळेचे कलाशिक्षक  नेरुरकर या कामी पुढाकार घेतला. यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल अध्यक्षा प्रिया पाटील, सचिव सायली सातवळकर, डॉ.संजीवनी गुणे, आरती खेर, मेधा तांडेल, रो. डॉ.अमोद दिवेकर, विवेक खाडये, माजी अध्यक्ष भगवान पाटील,संतोष घोडींदे, ऋषी बुवा, अनिल ठकेकर, दिपक गडगे,  यांच्यासह ऍनस उपस्थित होत्या. यावर्षी आपल्या घरी शाडू च्या मातीच्या गणेश मूर्ती गणेशोत्सव काळात आणाव्यात व पर्यावरण संतुलन राखावे असे आवाहन रोटरी च्या अध्यक्षा प्रिया पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले .

Leave a Reply

Your email address will not be published.