मिसेज इंडिया वर्ल्ड वाइडमध्ये चमकणार पनवेलचे सौदर्य

ग्रीस येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी डॉ. संगीता देवीकर  यांची निवड

पनवेल/प्रतिनिधी-  खांदा वसाहतीतील रहिवाशी  व नामांकित दंतचिकित्सक डॉ संगिता देवीकर यांची ग्रीस येथे होणाऱ्या मिसेज इंडिया वर्ल्ड वाइड स्पर्धेच्या  अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यानिमित्ताने पनवेलचे नाव साता समुद्रपार जाणार आहे. ही स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीकोनातून  डॉ. देवीकर यांचा सराव सुरू आहे. त्याकरीता सामाजिक, वैदयकीय क्षेत्रातील व्यक्तींना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नागपूर च्या डेंटल कॉलेज च्या विदयार्थींनी  असललेल्या डॉ संगिता यांनी सुरूवातीपासून सौदर्य  क्षेत्रात आवड होती. आपला पेशा सांभाळून त्यांनी फॅशनचा छंदही जोपासला. इतकेच नाही तर त्यामध्ये नावलैकीक सुध्दा प्राप्त केले आहे. अर्थात  नवी मुंबई महापालिका रुग्णालयात मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले त्यांचे पती डॉ. राजेश देवकर यांनी  आपल्या पत्नीला प्रोत्साहन आणि पाठबळ दिले आहे. मिसेज इंडिया वर्ड वाईड या स्पर्धेच्या  रूपांने त्यांना मोठी संधी प्राप्त झालेली आहे.  पनवेल परिसरात त्यांना मोठया प्रमाणात पाठबळ मिळत आहे.   ही स्पर्धा डॉ संगिता देवीकर यांनी  जिंकावी असे प्रत्येकाला मनोमन वाटते . सौंदर्यक्षेत्राचा  एक भाग बनण्याचे माझे स्वप्न होते. ते सत्यात उतरविण्यासाठी मी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला असल्याचे डॉ संगिता सांगतात.   यानिमित्ताने  मी माझी लपलेली प्रतिभा दाखवून स्वप्न पूर्ण करू शकते असेही त्यांनी सांगितले. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या स्पर्धेच्या ऑडिशनची सुरुवात झाली.बावीस हजार जणींमधून    अंतिम 172स्पर्धेक निवडले गेले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये आग्रा येथे निवड स्पर्धा संपन्न झाली.  झाला. डॉ संगिता यांना नृत्य आणि प्रवासाची  आवड आहे. त्या फिटनेसवर अधिक लक्ष्य देतात. क्रिडापट्टू, नृत्यांगणा तसेच माँडेल व्हायलाही त्यांना आवडेल. 10 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत मिसेज इंडिया वर्ड वाईड स्पर्धा संपन्न होणार आहे.

“आजच्या घडीला ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून डोक्यावर  सौदर्याचा मुकुट बसावा इतकेच उदिष्टय डोळयासमोर आहे. ते साध्य करण्याची मनामध्ये प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्याकरीता पनवेलकरांच्या शुभेच्छा, पाठबळ आणि आर्शिवादाची आवश्यकता आहे. मला खात्री आहे की मी यामध्ये यशश्वी होवून आपल्या शहराचे नावलैकी वाढवेल”.

डॉ. संगीता देवीकर

स्पर्धेक

मिसेज इंडिया वर्ल्ड वाईड स्पर्धा

Leave a Reply

Your email address will not be published.