पनवेल महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अलर्ट

आयुक्तांनी घेतली आढावा बैठक
पनवेल प्रतिनिधी
अतिवृष्टीमळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सा मना करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचा आपत्कालीन विभाग सज्ज झाला या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शनिवारी सकाळी तातडीचे आढावा बैठक घेतली. यावेळी संबंधितांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या, तसेच ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्याचा निचरा करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त , उपआयुक्त , सहा . आयुक्त , सर्व प्रभाग अधिकारी , सर्व आरोग्य निरिक्षक , सर्व अभियंता व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते . यावेळी बांधकाम विभाग , पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला .तसेच प्रभाग कार्यालयांमध्ये आपत्कालीन नियोजनासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देणेत आले . अतिवृष्टीमुळे शहराच्या ज्या सखल भागात पाणी साठले आहे , घरात पाणी घुसले आहे अशा ठिकाणांची दुपार पर्यत यादी सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत . या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाचे नियोजन करण्यात आले असून प्रभाग अधिका – यांनी अशा सर्व ठिकाणांना आज भेटी देऊन त्याचा अहवाल देण्याच्या सुचना दिल्या आहेत . अतिक्रमण विभागाची वाहन यंत्रणा आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी वाहन विभागाची वाहने चारही प्रभाग कार्यालयामध्ये रात्रीसाठी उपलब्ध करणेत आली आहेत . महापालिकेच्या सर्व अधिका – यांना समन्वयासाठी पदाधिकारी तसेच माध्यमांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . नागरिकांनी यास्थितीत कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आपत्कालीन स्थितीत घाबरून न जाता महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे .