अमरधाम स्मशानभूमी समोर कार पेटली

पनवेल /प्रतिनिधी :-अमरधाम स्मशानभूमी समोरील सीएनजी पंपाच्या बाजूला सर्व्हिस रोडवर सोमवारी साडेबारा वाजता एका चालत्या कारणे पेट घेतला. काही वेळातच पनवेल महानगरपालिका आणि सिडकोच्या अग्निशमन दलाचे पथक या ठिकाणी दाखल झाले. आणि त्यांनी द बर्निंग कार विझवली. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.