कुकडीच्या ओव्हर  ‘फ्लो’चा दुष्काळग्रस्तांना दिलासा

अवर्तन सोडणार असल्याचे पालकमंञ्यांची माहिती 
प्रकल्प क्षेञात समाधानकारक  जलसाठा
अहमदनगर/ प्रतिनिधी:- पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या कुकडी प्रकल्प समाधानकारक पाऊस झाला आहे. या ठिकाणच्या ओव्हर  फ्लो चे आवर्तन मंगळवारपासून सोडण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा .राम शिंदे यांनी दिली . त्यामुळे कुकडी लाभक्षेत्र  परिसराला याचा फायदा होणार आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे, पिंपळगाव जोगे या धरणांचा समावेश होतो. या धरणांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ३०.५४ टीएमसी आहे. या धरणातील पाण्याचा लाभ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, तर नगर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, श्रीगोंदा आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या सात तालुक्‍यांना शेती सिंचन व बिगर सिंचनासाठी (औद्योगिक व पिण्यासाठी) होतो. हा प्रकल्प  खरीप व रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी आहे. गेल्या काही दिवसापासून प्रकल्प क्षेत्राला दमदार पाऊस झाल्याने त्या ठिकाणी समाधानकारक जलसाठा झाला आहे. त्या अनुषंगाने ओवर फ्लो झालेल्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात या दृष्टिकोनातून अहमदनगर चे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी जलसंपदा विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आवर्तन सोडण्यात येणार आहे. दरम्यान कुकडी प्रकल्प लाभ क्षेत्रामध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने त्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य स्थिती  कायम आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्या तरी पाऊस पडत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान मंगळवारपासून कुकडीचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे . त्याच बरोबर कुकडी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कुकडी प्रकल्पात पुरेसा पाणी साठा झाला आहे. ही समाधानकारक बाब असून पुढील काही दिवसात या परिसरात पाऊस होऊन धरण भरेल ही अपेक्षा आहे. दरम्यान 30 जुलै पासून दुष्काळी भागाला दिलासा देण्यासाठी  कुकडीच्या  ओव्हर फ्लो चे आवर्तन सोडण्यात येणार आहे.”
 प्रा. राम शिंदे,
पालकमंत्री, अ, नगर.

Leave a Reply

Your email address will not be published.