अहमदनगर मध्ये राम कृष्णा बरोबर वैभवही

अहमदनगर मध्ये राम कृष्णा बरोबर वैभवही
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार
मुंबई /प्रतिनिधी:-  अहमदनगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे सबका   मालिक एक म्हणजेच शिर्डीचे साईबाबा आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा नावात कृष्णा हे तेही आपल्याकडे आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा राम शिंदे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात राम आणि कृष्ण आहेतच. त्याचबरोबर वैभव पिचड यांच्या रूपाने आज वैभवही प्राप्त झाले असल्याचे गौरवोद्गार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
बुधवारी मुंबई येथे शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड चिरंजीव वैभव पिचड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यानिमित्ताने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार बॅटिंग केली. मधुकर पिचड यांच्या  कार्याचा गौरव करताना ते अतिशय प्रामाणिक नेते असल्याचे सांगितले. मधुकरराव पिचड यांनी  विरोधी पक्षनेते मंत्री म्हणून चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटलांनी मार्ग दाखवला
पक्ष प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या वतीने मधुकरराव पिचड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचा नामोल्लेख करीत आम्हा सर्वांना मार्ग दाखवणारे राधाकृष्ण विखे पाटील करतात अशा शब्दात उल्लेख करतात टाळ्यांचा कडकडाट झाला.