प्रा.राम शिंदे यांच्या विकास कामांचा भाजपने दिला  हिशोब

प्रत्येक गावा निहाय केलेल्या कामांची यादी जाहीर
मतदार संघात मांडला जातोय दहा वर्षांचा लेखाजोखा
अहमदनगर /प्रतिनिधी: – अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे गेली दोन टर्म कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पणन मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा गावा निहाय हिशोब दिला आहे. गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची तर यादीच  जाहीर केले आहे. एकंदरीतच या माध्यमातून  भाजपने  लढाईच्या अगोदरच विरोधकांची  कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्जत- जामखेड हा विधानसभा मतदारसंघ पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड च्या सीमेवर आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यांची राजकीय छटा अहमदनगरच्या या विधानसभा मतदारसंघावर उमटते.काही वर्ष आरक्षित राहिलेल्या या मतदारसंघाचे नेतृत्व विद्यमान शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.  कर्जत जामखेड हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. दरम्यान केंद्र आणि राज्यात या अगोदर आघाडीची सत्ता होती. सत्ता एका पक्षाची आणि आमदार दुसर्‍या पक्षाचा यामुळे दु्ष्काळग्रस्त  कर्जत -जामखेड हे दोन तालुके सातत्याने दुर्लक्षित राहिले. दरम्यान 2009 ला प्रा .राम शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने विशेषता दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. आणि प्रा. शिंदे यांच्या रूपाने  या मतदारसंघाला शेतकरी  कुटुंबातील आमदार मिळाला .परंतु दोन्हीकडे पुन्हा राष्ट्रीय पुरोगामी आघाडीचे सरकार आले. असे असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी पाठपुरावा करून मतदार संघातात  अनेक विकास कामे केली.परंतु  मागील निवडणुकीत राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले. प्रा. राम शिंदे यांनी  राज्याच्या मंत्रिमंडळ राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली . गृह, पर्यटन, पणन, आरोग्य यासारख्या विविध खात्यांचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी प्रा. शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून  प्रा.शिंदे यांना 
कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली. दरम्यान गेल्या पावणे पाच वर्षांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रकल्प मार्गी लावण्यात आले. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी आपल्या होम ग्राऊंड वर म्हणजेच कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला. त्यांनी विकास कामे  याठिकाणी केले. आताही दोन्ही तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. दररोज भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम ठिकाणी पार पडत आहेत. दरम्यान गेल्या दहा वर्षात कोणत्या गावात किती काम केले. याचा हिशोब देण्यास स्थानिक आमदार या नात्याने पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सुरू केले आहे. याबाबतचा लेखाजोखाच त्यांनी तयार केला आहे. प्रत्येक गावात आपण काय विकास केला याचे स्वतःहून जणूकाही लेखापरीक्षणाच त्यांनी करून घेतले आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे जात असताना त्या अगोदर आपल्या आमदाराने आपल्यासाठी काय केले याची माहिती करून देण्याचा यापाठीमागे उदात्त हेतू असल्याचेही कार्यकर्ते सांगतात. दरम्यान कर्जत आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं प्रयत्न प्रा. शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत केल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावानुसार केलेल्या कामांचे फलक लावण्यास सुरुवात केली आहे.
हे आम्ही करून दाखवले
दरम्यान कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांनी तयारीही सुरू केली आहे. या मतदारसंघाचा विकास झाला नसल्याचा त्यांच्याकडून आरोप होत आहे. परंतु प्रत्येक गावात पालकमंत्र्यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून, भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते विरोधकांना पर्यायाने पवार यांना शह देण्याच्या दृष्टिकोनातून विकास कामांचा हिशोब दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.