आपल्यातला तो आपलाच अन परका तो परकाच

प्रा . राम शिंदे यांचा रोहित पवारांना टोला
कर्जत प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील २१ गावांसाठी संजीवनी देणार्‍या तुकाई चारी योजना अमलात आणली. याकरिता १०० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर करून घेतले. अनेक वर्षांचा प्रश्न मंत्रिपदाच्या माध्यमातून सोडविता आला. या भागात विविध विकासकामांसाठी भरभरून निधी विविध योजना आणण्याचे काम सातत्याने केले आहे . आणि यापुढेही अजून निधी देण्याची तरतूद करून मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करणारच. शेवटी आपल्यातला तो आपलाच अन परका तो परकाच एवढं मात्र खरं. असे सांगत अहमदनगर चे पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी रोहित पवार यांना टोला लगावला.

सोमवारी चांदे खुर्द ता.कर्जत येथे वालवड चांदे खुर्द ते गुरवपिंप्री रस्ता डांबरीकरण, गावाअंतर्गत रस्त्या काँक्रीटीकरण काम, मारुती मंदिरा समोरील सुशोभीकरणाचे काम, भोसलेवस्ती येथे सभामंडप बांधकाम या विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांनी करून उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते
ज्या परिस्थितीत मी माझं आयुष्य जगलो आहे ते आयुष्य माझ्या मतदाराच्या वाटेला येऊ नये म्हणून मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी माझ्या मंतदारांना अभिमान वाटेल असे कार्य जलसंधारण खात्याच्या माध्यमातून केलं आहे. कारखानदारी-उद्योग, शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा स्वार्थी विचार कधी मनाला शिवला देखील नाही. नेहमी सर्वसामान्य माणूस म्हणून जी माझी गरज आहेत तीच सर्वसामान्य लोकांना मिळाली पाहिजे म्हणून नेहमी प्रयत्न केले. असल्याचेही प्रा राम शिंदे यांनी सांगितले.

यावेळी कर्जत चे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष , अशोक खेडकर, .बळीरामअण्णा यादव, पवार गुरुजी, संपत बावडकर, अमृत लिंगडे, सरपंच , प्रल्हाद सुर्यवंशी, उपसरपंच , अर्जुन सुर्यवंशी, रामदास पवार, किरण सुर्यवंशी ,दत्ता भोसले, भरत सुर्यवंशी, राजुद्दीन सय्यद, श्री.दादा सुर्यवंशी, विनायक भोसले, शरद गंगावणे, बबन गंगावणे, आबा सूर्यवंशी, राघू बरणे, दत्ता आबा भोसले, अनिल सूर्यवंशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.