पूरग्रस्तांच्या पंक्तीत अहमदनगरचे  पालकमंत्री 

कोपरगाव येथील आपत्कालीन कक्षात बैठक मारून  घेतला अल्पोपहार
कोपरगाव /प्रतिनिधी मंत्रीपदाचा  डामडौल बाजूला ठेवून सातत्याने सर्वसामान्यांमध्ये वावरण्याचा अहमदनगर चे पालकमंत्री राम शिंदे यांचे  स्वभाव वैशिष्ट्य आहे. अचानक गाड्यांचा ताफा थांबून शेतात पेरणी करणे, बांधावर बसून ठेचा भाकरी खाणे, तलावात पोहणे , कुस्तीच्या आखाड्यात उतरणे अशा अनेक गोष्टी  नगरकरांनी अनुभवल्या  आहेत. मंगळवारी प्रा. शिंदे यांनी कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी लग्नाच्या पूरग्रस्त गावांचा दौरा केला. त्यांना ज्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. तिथे पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या पंक्तीत मांडीला मांडी लावून बसतात अल्पोहार घेतला. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांनीही भारतीय बैठक मांडली.
पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी  आपत्कालिन परिस्थितीमध्ये व्यवस्थेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच विस्थपितांच्या नुकसानाचे पंचनामे संबंधित विभागमार्फत करुन सदरचे सानुग्रह अनुदान त्वरित पुरग्रस्तांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत निर्देश दिले.  याबाबत मदत व पुनर्वसन खात्यासोबत त्वरित बैठक घेऊन आवश्यक ती पाउले उचलली जातील तसेच अशी परिस्थिती पुढील काळात येणार नाही यासाठी करावयाच्या कायमस्वरुपीच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्यासही त्यांनी प्रशासनाला सांगितले. 
दरम्यान  पुरग्रस्तांना स्थानिक आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूह तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरक्षित स्थळी हलविले .  त्यांची अन्न व निवाऱ्याची व्यवस्था लावली. यावेळी प्रा. राम शिंदे यांनी पूरग्रस्तांची चर्चा केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी त्यांना अल्पोपहार वाटण्याचे काम सुरू होते. पालकमंत्र्यांनी लगेचच पंक्तीत बैठक मारली आणि पूरग्रस्तांना बरोबर अल्पोपहार घेतला.यामाध्यमातुन  दिलासा देत आपलेसे केले
यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी पंडित वाघेरे, सरपंच पुष्पा माळी, उपसरपंच सुनिता ढमाले,  शिवाजीराव वत्ते, कल्याणराव दहे, सोमनाथ गायकवाड  यांच्यासह अधिकारी वर्ग व परिसरातील नागरिक उपस्थित होते.