खांदा वसाहती लगत अपघाती वळणावर रुंदीकरणाचा पर्याय

प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांचा पाठपुरावा

पनवेल महापालिकेकडून सकारात्मक भूमिका

पनवेल/ प्रतिनिधी: – खांदा वसाहतीतून जाणाऱ्या महामार्गाच्या उड्डाणपुला लगत असलेल्या वळणावर दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा बळी गेल्याची नोंद आहे. या अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून अपघात प्रवण क्षेत्रात मार्गी केचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव प्रभाग समिती चे सभापती संजय भोपी यांनी दिला होता. त्यानुसार महापालिकेने सकारात्मक भूमिका घेत दोन दिवसापूर्वी या ठिकाणी येऊन पाहणी सुध्दा  केली याबाबत  प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

खांदा वसाहतीतून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गचे  कळंबोली सर्कल पासून रुंदीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर वसाहतीच्या प्रवेशद्वारावर रस्ते महामंडळाकडून उड्डाणपूल ही बांधण्यात आला आहे.

 खांदा वसाहती कडून  पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी उड्डापूलाच्या बाजूला असलेल्या मार्गीके वरून जावे लागते. या पुढे जो बाह्यवळण रस्ता आहे तो अतिशय अरुंद आहे. कळंबोली कडून  उड्डाणपूल  उतरताना हा रस्ता एकत्र येतो. त्यामुळे दोनहीकडून आलेली  वाहन एकाच लेन वर येतात . त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. इतकेच नाही तर आज तागायत चार जणांचा जीव या बाह्यवळण रस्त्यावर गेलेला आहे. एकंदरीतच हे   ठिकाण एक प्रकारे  मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. हा रस्ता असाच राहिला तर अनेकांना आपले जीव गमवावे लागतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. या बाबत प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी आढावा बैठकीत सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या ही बाबा लक्षात आणून दिली. त्यानंतर लागलीच सभागृह नेते , सभापती संजय भोपी यांनी महापालिका शहर अभियंता कटेकर, सुधीर साळुंके यांना बरोबर घेऊन दोन दिवसांपूर्वी पाहणी  केली. दरम्यान या ठिकाणी अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काही मीटर रुंदीकरण करण्याची मागणी भोपी यांनी केली. मनपा अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली.