आगरी शिक्षण संस्थेत ‘लेक वाचवा लेक शिकवा’ चा संदेश

आगरी शिक्षण संस्थेत ‘लेक वाचवा लेक शिकवा’ चा संदेश
विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जनजागृती
नॅचरल हेल्थ एज्युकेशन  फाउंडेशन व भाजप प्रणित बेटी बचावो बेटी पढावो अभियानाचा उपक्रम
पनवेल/ प्रतिनिधी: – एकविसाव्या शतकात आजही मुलगा आणि मुलींमध्ये भेद केला जातो. कित्येक ठिकाणी  गर्भनिदान गर्भपात केला जातो. दरम्यान स्त्रियांचे जन्म प्रमाण वाढावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने बेटी बचावो बेटी पढावो हे अभियान स्थानिक पातळीवर प्रभावीपणे राबवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर खांदा वसाहतीतील आगरी शिक्षण संस्थेमध्ये शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने नॅचरल हेल्थ अंँण्ड एज्युकेशन फाउंडेशन, स्टेप ऑन व ऑरगॅनिक सॅनिटरी नॅपकिन्स वतीने विद्यार्थिनींना मासिक पाळी आणि जैविक सॅनेटरी नॅपकिन याविषयी इथंभूत माहिती देण्यात आली.
वंशाला  दिवा पाहजे  म्हणून आजही अनेक ठिकाणी मुलींना  जन्माच्या आगोदर मारले जाते. गर्भनिदान चाचणी करून मुलगी असली तर गर्भपात या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातही होत आहे. त्याला पुरोगामी  समजला जाणारा महाराष्ट्र सुध्दा  अपवाद नाही. मात्र दिवसेदिवस जनजागृती, प्रबोधन होत  आहे,बेटी बचाओ, बेटी पढाओ याकरीता सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहर व तालुका पातळीवर हे अभियान प्रभावीपणे राबविले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रणित बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान रायगड जिल्हा, पनवेल तालुका आणि शहर च्या वतीने आगरी शिक्षण संस्थेमध्ये प्रबोधन करण्यात आले. त्याचबरोबर नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन, स्टेप ऑन व ऑरगॅनिक सॅनिटरी नॅपकिन्स यांच्यामार्फत आरोग्य काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
 दरम्यान मासिक पाळी बद्दल अशिक्षितच नाही तर सुशिक्षीत महिलांमध्ये सुद्धा बरेच गैरसमज असून त्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाते. पूर्वजांनी आपल्या घरातील मुली व महिलांची काळजी घेण्यासाठी जे नियम बनवले होते. तेच नंतर परंपरेच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने  मांडले गेले.   
आज मुली शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत असताना मासिक पाळीमध्ये लोकांकडून त्यांना मिळालेल्या वागणुकीमुळे बरेच न्यूनगंड निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर सुद्धा होताना दिसतो.
अशा थोड्या दुर्लक्षीत पण गंभीर विषयावर नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रभर काम करत आहे. त्यांनी आगरी शिक्षण संस्थेमध्ये आठवी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शुक्रवारी मार्गदर्शन केले
त्याच बरोबर बाजारात उपलब्ध असणारे प्लास्टिक आणि रासायनिक सॅनिटरी नॅपकिन्स मुळे गर्भाशयाचे विविध आजार  किव्हा सारवायकल कँसर होण्याचा धोका सुद्धा संभवतो. त्यामुळे महिलांनी ऑरगॅनिक किव्हा नैसर्गिक पॅड वापरावेत याबाबद्दल सुद्धा मुलींना माहिती देण्यात आली.
यावेळी विदयार्थींना  मासिक पाळी मध्ये त्रास होऊ नये म्हणून घायवयाची काळजी, आहार त्याचबरोबर या विषयी भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना  शैला खाडे यांनी उत्तरे दिली.
समुपदेशक दिपक खाडे यांनी  मासिक पाळी विषयी जनजागृती बरोबर मुलींना शिक्षणाचं महत्व पटवून दिले तसेच  विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी विषयी माहिती देण्यात आली. यावेळी गरजूंना स्टेपऑन ऑरगॅनिक सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.
यावेळी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या रायगड जिल्हा संयोजिका सुहासिनी केकाने , उपसंयोजिका अंजली इनामदार यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला , नगरसेविका सिताताई सदानंद पाटील
, माजी नगरसेविका नीता माळी,  अनिता रणदिवे, किरण सिंग, रीमा रावल, सुनीता गुरव, भारती एकतारे,,साळुंखे, मुख्याध्यापिका  तांडेल,शाळेतील शिक्षक, शिक्षिका, संजीव पार्थे, उपस्थित होते.