एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी

सभापती संजय भोपी यांचा निर्णय
पनवेल/ प्रतिनिधी: – पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील पूरग्रस्तांसाठी पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ब चे सभापती संजय दिनकर भोपी यांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांना त्यांनी पत्र दिले आहे.

सांगली कोल्हापूर आणि साताऱ्यातील काही भागात महापुराचे थैमान घातले आहे. नद्यांना पूर आल्याने गावाची गाव पाण्यात बुडाली आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे आले आहेत. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी पूरग्रस्तांसाठी आपले एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर संजय भोपी प्रतिष्ठान, मॉर्निंग योगा ग्रुप, अलर्ट सिटीझन फोरम, श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, युवा प्रतिष्ठान, आझाद ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सभापती संजय भोपी यांच्या खांदा वसाहतीतील जनसंपर्क कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना कोणाला मदत करायची असेल तर नवनाथ मेगडे – 8779567050
अभिषेक भोपी – 9820702043 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आले करण्यात आले आहे.