पनवेलच्या शासकीय अधिकार्‍यांकडून पूरग्रस्तांना लाखमोलाची मदत

जीवनावश्यक वस्तू खरेदी करून पश्चिम महाराष्ट्रात पाठवल्या
राज्यासमोर ठेवला आदर्श वस्तुपाठ
पनवेल/ प्रतिनिधी: – पनवेलमध्ये आपले दैनंदिन कामकाज सांभाळून   येथील शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. या सर्वांनी दहा लाख रुपये जमा करून. त्यातून जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या आहेत. रविवारी ही सर्व मदत सांगली आणि कोल्हापूर कडे पाठवण्यात आली . या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे.
गेल्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यातील काही भागात महापुराचे थैमान घातला आहे. नद्यांना पूर येऊन गावाची गाव पाण्यात बुडाली आहेत. लाखो एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्याचबरोबर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. या दोन्ही जिल्ह्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. या अनुषंगाने पूरग्रस्तांना करिता अनेकांकडून मदतीचा हात दिले जात आहेत. यामध्ये पनवेल परिसरातील शासकीय अधिकारी सुद्धा मागे राहिले नाहीत. पोलीस, महसूल, परिवहन, ग्रामविकास, महानगरपालिका या विभागाबरोबरच इतर खात्यातील सर्व अधिकारी कर्मचारीएकत्र आले. या सर्वांनी दहा लाख त्यांची मदत जमा केली. त्यातून एक लाख पाण्याच्या बॉटल, 5000 सॅनिटरी नॅपकिन, 7000 माऊथ मास्क, फरसाण आणि बिस्किटाचे पॅकेट अन्य खाद्यपदार्थ खरेदी केले. या सगळ्या जीवनावश्यक वस्तू रविवारी कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना करिता पाठवण्यात आल्या. यावेळी महापालिका आयुक्त गणेश देशमुख, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार अमित सानप, गटविकास अधिकारी डी एन. तेटगुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, योगेश मोरे, शशिकांत तिरसे, शहर अभियंता संजय कटेकर, सुधीर साळुंके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मदत कार्याची जबाबदारी अमित सानपांचा पुढाकार
सांगली वरून कोल्हापूरकडे जाणारा रस्ता बंद आहे. त्यामुळे प्रथम सर्व साहित्य सांगलीला नेण्यात येणार आहे. रस्ता सुरू झाल्यानंतर अर्ध्या जीवनावश्यक वस्तू कोल्हापूरला रवाना केल्या जातील. तहसीलदार अमित सानप त्यांनी याबाबत जबाबदारी घेतलेली आहे. या आगोदरही  सानप यांनी पाणी व बिस्किट पाठवले होते.तसेच एनडीआरएफच्या जवानांची जेवनाची सोय केली होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील व शशिकांत तिरसे हे पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेवून आहेत.