पनवेल तालुक्यात कृमीनाशक  अभियान

रोटरी क्लब फार्मासिटिकल तसेच केमिस्ट  असोसिएशनचा पुढाकार
राष्ट्रीय कृमिनाशक दिनाचे औचित्य
पनवेल/प्रतिनिधी: –  आता सुरू असलेला पावसाळा, त्याचबरोबर बदलणारे वातावरण या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीत रविवारी कृमीनाशक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. याचा 42000  नागरिकांनी लाभ घेतला.रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रायगड जिल्हा केमिस्ट व डिस्ट्रीबुटर्स असोसिएशन, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखेच्या वतीने  हे अभियान राबविण्यात आले . निमित्त होते  राष्ट्रीय कृमिनाशक दिनाचे. पनवेल तालुका पंचायत समितीच्या याकरीता सहकार्य लाभले.
पनवेल तालुक्यातील केमिस्ट, फार्मासिस्ट  , रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे सर्व सदस्य, विसपुते फार्मसी कॉलेज चे विद्यार्थी  या कार्यक्रमात सहभागी झाले होते. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कृमिनाशक गोळया वाटप करण्यात आल्या. यासाठी अखिल भारतीय औषध विक्रेता महासंघा चे अध्यक्ष आमदार जगन्नाथ तथा आप्पासाहेब शिंदे यांनी 50000 गोळ्या तसेच आयपीए कडून 8500 गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. गावांतील सर्व प्रौढ  व्यक्तींना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटील, सचिव प्रवीण नावंधर , आयपीए चे सचिव नितीन मणियार अन्न व औषध प्रशासनाचे माजी सहाय्यक आयुक्त साहेबराव साळुंखे , औषध निरीक्षक गादेवर , पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते  परेश ठाकूर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी एन ते तेटगुरे ,पनवेल पंचायत समिती सभापती प्रणाली भोईर, माजी सदस्य निलेश पाटील , विक्रम कैय्या, ऋषीकेश बुवा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते. ही मोहीम राबविण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांचे उत्तम सहकार्य मिळाले 
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या आरोग्य प्रमुख डॉ संजीवनी गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षा प्रिया पाटील व जेष्ठ रोटरी सदस्य व आयपीेए चे खजिनदार संतोष घोडींदे यांनी या अभियानाचे नियोजन केले.