झोपडपट्टीतील बच्चे कंपनीच्या हातात तिरंगी झेंडे

कळंबोलीत साजरा झाला अनोखा स्वातंत्र्यदिन    
भाजपाचे शहर उपाध्यक्ष नितीन काळे यांचा पुढाकार
कळंबोली/प्रतिनिधी- पाठीवर बिऱ्हाड आणि हातावर पोट असलेल्यांना गरीबीला आग लागली असल्याने  सण उत्सव कसे असतात ते माहितीच नसते . राष्ट्रीय सण साजरे करण्याचा तर प्रश्न येत नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या शाळेकरी मुलांच्या हातातील झेंडयाचे झोपडीत राहणाऱ्या मुलांना कमलीचे कुतुहल असते. आपणही दोनही हातात झेंडे घेवून वेगळी अनुभुती घ्यावी अशी इच्छा त्यांच्या चेहऱ्यावर पाहून कळंबोली भाजपाचे उपाध्यक्ष नितीन काळे यांनी सिंग हॉस्पिटल समोरील झोपडपट्टीतील मुलांबरोबर गुरुवारी स्वातंत्र्यदिन साजरा केला.
भरतीय स्वतंत्र्याला सात दशक होत असताना आजही गरीबीला मात्र स्वातंत्र मिळालेले नाही. बुधवारी भारताने आपला स्वातंत्र्यदिन  साजरा केला असला तरी झोपडीत राहणाऱ्या कुटुंबांना 15 ऑगस्टचे काहीच सोयर सुतक दिसत नाही. कारण त्यांना आपल्या मुलभूत गरजा भागवताना नाकी नऊ येतो. त्यातच कारवाईची टांगती तलवार हे  भयान वास्तव कळंबोली होल्डींग पाँडच्या बाजूला तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या झोपडयात गेल्यानंतर दिसते. मराठवाडा आणि विदर्भात दोन हातांना काम मिळत नाही म्हणून शंभरपेक्षा जास्त कुटुंब कळंबोलीत येवून गेल्या काही वर्षापासून राहात आहेत. अन्न, वस्त्र, निवाऱ्याकरीता रक्ताचे पाणी करीत आहेत. कचरा वेचून त्यातून मिळणाऱ्या पैशातून कसबास उदरनिर्वाह ते करतात. अनेकदा उपाशी सुध्दा झोपावे लागते. अशा स्थितीत सण उत्सव साजरे करण्याचा विषयच नाही. 15 आँगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवसांचे येथे राहणाऱ्यांना काहीच वेगळे वाटत नाही. कारण स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकांच्या त्यांच्या जीवनावर फारशा परिणाम झालेलाच नाही. त्यामुळे त्यादिवशी पांढरे कपडे घालून ध्वजावंदन, प्रभात फेरी तसेच विविध कार्यक्रमांना हजेरी त्यांनी कधील लावली नाही. धनदांडगे व मध्यमवर्गीयांच्या मुलांप्रमाणे या झोपडयात राहणाऱ्या चिमुकल्यांच्या हातात झेंडा दिसत नाही. त्या शर्टाला तिरंगा कधीच लावलाच गेला नाही. त्यामुळे ही मुल प्रजासत्ताक आणि स्वातंत्र दिनाच्या दिवशी रस्त्यावर पडलेले झेंडे गोळा करण्याकरीता धावत असत. त्यातून एखादा झेंडा मिळाला तर त्यांच्यात भांडणे आणि वाद निर्माण व्हायचे त्या झेंडयाचा आनंद फारशा लुटत येत नसे. या चिमुकल्यांची कुतुहलता नितीन काळे यांनी याअगोदर  पार पडलेल्या प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या वेळी पाहिले आणि त्यांनी  यापुढे दोन्ही राष्ट्रीय सण झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरा करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गुरूवारी काळे आपल्या सहकाऱ्यांसोबत सकाळी सिंग हॉस्पिटल समोरील झोपडपट्टीत आले . त्यांनी आपल्या सोबत पाच डझन लहान झेंडे आणले होते. त्याचबरोबर खिशाला लावण्याकरीता तिंरगे सुध्दा  घेवून आले होते. इतके झेंडे पाहून सर्व मुल एकवटले आणि काका मला मला असे म्हणत आनंदाने नाचू लागले. प्रत्येकाच्या हातात दोन झेंडे देण्यात आले. तसेच शर्टाला पिन लावून तिरंगा लावण्यात आला. चिमुकल्यांची इच्छा पूर्ण झाल्याने त्यांच्या आनंदाला पाराच उरला नव्हता. नितीन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या भारत माता की जय घोषणेत या बच्चे कंपनीनी आपला सुर मिसळवला. चाँकेलट देवून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. या  स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन कचरा वेचून आलेले  या मुलांचे आई-वडिल अतिशय कुतुहलाने पहात होते. त्याचबरोबर नितीन काळे अध्यक्ष असलेल्या साई सेवा संस्थेच्या वतीने जमा केलेले कपडे या झोपडयांमध्ये वाटप करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published.