दंडाच्या पावती ऐवजी हातात राखी

खारघर वाहतूक शाखेचे अनोखे रक्षाबंधन
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थीही उपक्रमात सहभागी
पनवेल /प्रतिनिधी: – एरव्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या च्या हातात दंडाची रक्कम पडते. परंतु गुरुवारी अशा वाहनचालकांच्या हाताला राखी बांधून नियम पाळण्याचे आवाहन  खारघर वाहतूक शाखेने केले.सरस्वती कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे आगळे वेगळे रक्षाबंधन साजरी करण्यात आले.
नवी मुंबई वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीच्या नियमांविषयी वारंवार विविध कार्यक्रमांतर्गत प्रबोधन आणि जनजागृती केली जाते. असे असतानाही आजही कित्येक जण नियम पायदळी तुडवतात. विशेष करून हेल्मेट विना अनेक जण दुचाकीवर स्वार होतात. तसेच चारचाकी चालवणारे सुद्धा सीट बेल्ट लावत नसल्याचे निदर्शनास येते. संबंधितांवर सातत्याने दंडात्मक कारवाई केली जातेच. परंतु प्रत्येक गोष्टी कारवाईमुळे साध्य होताच असे  नाही. त्याकरीता वेगवेगळ्या पद्धतीचे  प्रबोधन सुद्धा प्रभावी ठरू शकते. त्यानुसार रक्षाबंधनाचे औचित्य साधून खारघर मधील सरस्वती कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी  तसेच खारघर वाहतूक शाखा यांनी भारतीय स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला. त्यानिमित्ताने एनएसएसच्या  विद्यार्थ्यांनी  खारघर वाहतूक कर्मचाऱ्यां समवेत  विना हेल्मेट तसेच सीट बेल्ट न लावता वाहने चालवणाऱ्यांना राख्या बांधल्या त्याचबरोबर मिठाई देवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचेआवाहन केले.
Posted in Uncategorized