पाटनोलीत हरीनाम सप्ताह

आठ दिवस हरीनामाचा जागर
पनवेल/प्रतिनिधी- तालुक्यातील पाटनोली येथे दत्त मंदीरात शुक्रवार
पासून हरीनाम सप्ताहाला सुरूवात झाली. आठ दिवस यानिमित्ताने हरीनामाचा जागर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील

पाटनोली दरवर्षी श्रावण महिन्यात हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदाही ह.भ.प महेश महाराज साळुंखे यांच्या हस्ते विनापुजन करून या सोहळाची सुरूवात झाली.यावेळी पाटनोली ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.  दररोज रात्री  दिंडी भजनाचा जागर केला जातो. पंचक्रोशीतील भाविक मोठया संख्येने हजेरी लावत असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. मुळ पाटनोली स्थित पनवेल महानगरपालिकेचे नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांनी सप्ताहनिमित्त भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत.