रोडपालीचा राजा सर्वोत्कृष्ट विघ्नहर्ता

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून सन्मानित
पनवेल प्रतिनिधी : एकता सामाजिक सेवा संस्थेच्या  रोड पालीचा राजाला नवी मुंबई पोलीस आयुक्तालय विघ्नहर्ता पुरस्कार 2018 मध्ये  उत्कृष्ट गणेश मूर्ती करिता पारितोषिक देण्यात आले आहे. गणेशोत्सवातून ज्वलंत विषयावर प्रबोधन करणाऱ्या या मंडळाला सलग तिसऱ्या वर्षी सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
गेल्या वर्षी एकता सामाजिक सेवा संस्थेने अतिशय सुबक आणि मनमोहक बाप्पा च्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. विनय कदम, प्रशांत शिंदे, अमोल जाधव आणि नितीन धोड मनी या तरुण कार्यकर्त्यांनी उत्तम सजावट केली होती. त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, कार्याध्यक्ष संभाजी शिंदे, खजिनदार महेश हेगिष्टे, विशाल पाटील, मनीष तपासे, निलेश दाभेराव, सुमेध डोंगरे, सूर्यकांत राऊत, अर्जुन जाधव यांच्यासह इतरांनी पुढाकार घेऊन पाणी बचतीचा संदेश देणारा पोस्टरच्या माध्यमातून देखावा साकारला होता. याबद्दलही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून एकता सामाजिक सेवा संस्थेचे कौतुक करण्यात आले. शुक्रवारी वाशी येथील सिडको ऑडिटोरियम मध्ये पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते रोडपाली च्या राजाला पुरस्कार देण्यात आला. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.