विद्यानिधी शैक्षणिक संकुलात पर्यावरण पूरक स्वातंत्र्यदिन

खत निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ
मुंबई / प्रतिनिधी: -जुहू येथील विद्यानिधी शैक्षणिक संकुलात कचऱ्यावर खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार 
करण्यात येत आहेत. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करुन संस्थेच्या वतीने अनोखा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. तसेच इतर शाळांसमोर हा एक वस्तुपाठ निर्माण झाला आहे.
पुस्तकातील  अभ्यासक्रमा बरोबरच विद्यानिधी शैक्षणिक संकुलात मूलं रुपी गोळ्याला घडविण्याचे त्याचबरोबर आकार देण्याचे काम शाळा आणि शिक्षक करतात. शिक्षणाचे  धडे देण्याबरोबरच या शाळेत शिकणारे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न झाले पाहिजेत. ते उद्याचे उत्तम नागरिक म्हणून पुढे यावेत, तसेच  संस्कारक्षम  व्हावेत या उद्देशाने या शैक्षणिक संकुलात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांना पर्यावरण, श्रम, सामाजिक संस्कार देण्याचे काम शिक्षक करतात.
स्वछतेची शिस्त प्रत्येकाने पाळायला हवी. शहरात निर्माण होणारा कचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थे बरोबरच रहिवाशांची ही जबाबदारी आहे.ओल्या कचऱ्यापासून गृहनिर्माण  सोसायटया  व विद्यालयाने आपला कचरा आपली जबाबदारी या भावनेतून खत निर्मिती केली तर कचऱ्याची समस्या बऱ्याच अंशी निकाली निघू शकते. त्याच संकल्पनेतून विद्यानिधी शैक्षणिक संकुलाने ओल्या कचऱ्यापासून विद्यार्थी सहभागातून’ सेंद्रीय खत निर्मिती’  प्रकल्पाची उभारणा केली .या उपक्रमाचा शुभारंभ  प्रमुख पाहुणे अश्विन  श्रॉफ व उपनगर शिक्षण मंडळाचे  अध्यक्ष माजी राज्यपाल  पद्मनाभ आचार्य यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ६३  दात्यांनी रक्तदान केले.   यानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री संजीव मंत्री, कार्यवाहक डॉ. किर्तीदा मेहता, कोषाध्यक्ष विनायक दामले तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण पूरक राख्या … झाडांचे औक्षण
विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक वस्तूंपासून राख्या तयार केल्या होत्या. विशेष म्हणजे या शैक्षणिक संकुल परिसरात असलेल्या झाडांच औक्षण करून  राख्या बांधण्यात आल्या.या वृक्षरक्षाबांधनातून वृक्षसंवर्धनाचे संस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.