राज्यात ‘एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर’ योजना

मागणीनुसार शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर पुरविणार
ऊर्जामंत्री  चंद्रशेखर  बावनकुळे यांची माहिती 

अहमदनगर/प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यास विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून काम सुरु आहे. ज्या ग्रामपंचायती जमीन उपलब्ध करून देतील, तेथेे 1-2 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारले जातील. तसेच 2015 ते 2018 या कालावधीत ट्रांसफार्मर साठी पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक शेतकरी एक ट्रांसफार्मर याप्रमाणे ट्रांसफार्मर पुरवण्यात येतील, अशी माहिती  राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी चे ४००/२०० केव्ही प्रस्तावीतकर्जत उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा गुरूवारी बावनकुळे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, पंचायत समिती सभापती साधना कदम उपस्थित होते.   

 बावनकुळे म्हणाले, बाभळेश्वर नंतर कर्जत हा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून येथील उद्योग, रोजगार आणि शेतकऱ्यांना हवी असणारी वीज उपलब्ध होऊ शकेल. या मतदारसंघात यापूर्वीच 212 कोटींची कामे ऊर्जा विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहेत तर जिल्ह्यात आगामी तीन वर्षात 804 कोटींची कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आपण एक रुपये 60 पैसे दराने प्रति युनिट वीज उपलब्ध करून देतो. जिल्ह्यातील वीज बिलापोटी 13 हजार 500 कोटी रुपये थकित असतानाही राज्य शासनाने एकाही शेतकऱ्यांची वीज थकित बिलापोटी तगादा लावून तोडली नसल्याचे त्यांनी सांगितले. या सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी जिल्ह्यात सध्या 70 जागा मिळाले असून आठ ठिकाणी काम सुरू करण्यात आले आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्रात त्यांना हवी असणारी वीज 1 रुपये 20 पैसे अल्प दरात मिळू शकेल आणि ती 328 दिवस उपलब्ध होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री प्रा शिंदे यांनी घुमरी येथेही 33 केव्ही उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी यावेळी श्री बावनकुळे यांच्याकडे केली श्री मंत्रीमहोदयांनी आचारसंहितेपूर्वी या उपकेंद्राला मंजुरी देणार असल्याचे घोषणा यावेळी केली तसेच कर्जत येथील उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या सिद्धटेक ग्रामपंचायतीसाठी 50 लाख रुपयांची कामे ऊर्जा विभागाच्या माध्यमातून करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले

  पालकमंत्री प्रा शिंदे यांनी, घुमरी येथेही 33 केव्ही उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी यावेळी श्री. बावनकुळे यांच्याकडे केली. मंत्रीमहोदयांनी आचारसंहितेपूर्वी या उपकेंद्राला मंजुरी देणार असल्याची घोषणा यावेळी केली तसेच कर्जत येथील उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या सिद्धटेक ग्रामपंचायतीसाठी 50 लाख रुपयांची कामे ऊर्जा विभागाच्या माध्यमातून करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री प्रा शिंदे म्हणाले, हे वीज उपकेंद्र म्हणजे कर्जतच्या विकासाला पुढे घेऊन जाणारा प्रकल्प आहे. अहमदनगर सह पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला त्याचा लाभ होणार आहे. कर्जत-जामखेड परिसरात आगामी काळात एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग येतील, तेव्हा विजेची कमतरता पडू नये यासाठी या उपकेंद्राचा लाभ होईल. गेल्या पाच वर्षात कर्जत-जामखेड सह जिल्ह्यात विविध विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खा. विखे यांनी, गेल्या 5 वर्षात मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी भरीव प्रयत्न केल्याचे सांगितले. पाचपुते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

        कर्जत  परिसरात ४००.केव्ही.चे उपकेंद्राची निकड होती. कारण ४०० केव्ही बाभळेश्वर उपकेंद्रापासून ७०कि.मी. अंतरावर २२० के.व्ही. अहमदनगर व १२५ कि.मी. अंतरावर २२०.केव्ही. भोसे(बेलबंडी) उपकेंद्र आहे. प्रकल्पाचा अंदाजीत खर्च ३६८ कोटी रुपये असून उपकेंद्र उभारणीमुळे ४०० केव्ही बाभळेश्वर उपकेंदावरील बराच विदयुत भार कमी होईल. या उपकेंद्रातून एकूण ५ उपकेंद्रांना दाबाने वीजपुरवठा करण्यात येईल. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील २२० केव्ही. भोसे (बेलवंडी) व अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील २२० केव्ही.भिंगवण व कुरकुंभ तसेच सोलापूर जिल्हयातील २२० के.व्ही.जेऊर यांचा समावेश आहे. सोबतच या उपकेंद्रांवर अवलंबीत सर्व उपकेंद्राना सुद्धा योग्य दाबाने व अखंडीत विद्युत पुरवठा होण्याच्या दृष्टीने  फायदा होणार आहे. सदर उपकेंद्रामुळे २२० के.व्ही. विजेच्या वाहीन्यांची लांबी कमी होईल त्यामुळे आणखी योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. अहमदनगर जिहयातील कर्जत,श्रीगोंदा व जामखेड या तालुक्यामध्ये भविष्यात येणारी वीजेची मागणी पुर्ण करण्यास मदत होणार आहे.
            कार्यक्रमास  महापारेषण कंपनीचे प्रकल्प संचालक रविंद्र चव्हाण व संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांच्यासह नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता जयंत विके,महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंते प्रवीण भालेराव, शरद लोखंडे, किशोर जाधव आणि दिपक पाटील आदी उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published.