मुख्यमंत्र्यांनीही ठरवल! प्रा. राम शिंदे यांना पुन्हा मंत्री करायचं

जामखेड येथी महाजनादेश याञेच्या सभेत घोषणा
 कर्जत जामखेड करांनी दिला  उस्फूर्त प्रतिसाद
जामखेड/ प्रतिनिधी: मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही कर्जत जामखेड मध्ये कशासाठी महाजनादेश यात्रा घेऊन चालला आहात. कारण त्यांचं तर ठरला आहे. काय तुमचं ठरलंय ना! असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विचारताच उपस्थितांनी एक सुरात प्रा. राम शिंदे यांचे नाव घेतले. मी ही ठरवलयं की रामभाऊनां  पुन्हा मंत्री करायचं. तुम्ही जितके जास्त मताधिक्‍य द्याल तितका मोठं खातं त्यांना दिले जाईल असे सांगताच कार्यकर्त्यांनी टाळया वाजवत  एकच जल्लोष केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश  सोमवारी सांयकाळी  जामखेड येथे आगमन  झाले. त्यांचे  भव्यदिव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी पार पडलेल्या सभेत फडणवीस यांनी आपल्या जोश पूर्ण भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.  महाजनादेश भरभरून प्रतिसाद मिळत असताना विरोधकांच्या यात्रेला माणसं शोधावी लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीस हजार किलोमीटरचे रस्ते महाराष्ट्रात तयार करण्यात आले. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते बनवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. एकट्या नगर जिल्ह्यात 1410 कि.मीचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. आपल्याकडे मी महाजनादेश मागण्यासाठी आलो आहे. देणार की नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारताच खालून होय मिळणार असे उत्तर मिळाले. आपल्या पाठबळावर पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांना महाराष्ट्राच्या विधानसभेवर भाजप महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामामुळे सर्वसामान्यांपर्यंत विकास पोचला असल्याचे मत व्यक्त केले. अहमदनगर चे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत जामखेडला झालेल्या विकासकामांची माहिती दिली. निधीकरिता या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झुकते माप दिल्याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानले. या दोन्ही तालुक्यातील दुष्काळ निवारण आगामी काळात नक्कीच केले जाईल. त्यासाठी मुख्यमंत्री निधीची कमतरता पडू देणार नसल्याचा विश्वास प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
जामखेडच्या पाणीपुरवठा योजनेचे मंजुरी पत्र सपुर्द
दरम्यान जामखेड शहरा साठी 117 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. त्याला शासनाची मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरच प्रा. राम शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांकडे मंजुरी पत्र सुपूर्द केले.

Leave a Reply

Your email address will not be published.