अहमदनगर चे पालकमंत्री सोलापूरचे निरीक्षक

भाजप जिल्हा कोअर कमिटीची बैठक व इच्छुकांच्या मुलाखती
सोलापूर/ प्रतिनिधी: – अहमदनगर चे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे भाजपने सोलापूर जिल्ह्याचे  निरीक्षकपदाची महत्वाची  जबाबदारी सोपवली आहे. संघटनात्मक दृष्ट्या दांडगा अनुभव आणि सोलापूरचा भौगोलिक आणि राजकीय अभ्यास असल्याने प्रा. शिंदे यांची प्रदेश कार्यकारणीकडून या कामी  नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात येत्या दोन महिन्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येऊ घातली आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. येथेही भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग सुरू आहे. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीची परिस्थिती आहे. दरम्यान दिलीप सोपल यांच्यासारखे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. येत्या काही दिवसात विधानसभेची आचारसहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असलेल्या सोलापूरमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.त्यानुसार या जिल्हयाची  जबाबदारी राज्याचे पणन वस्त्रा उद्योग मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर पक्षाने सोपवली आहे. मंगळवारी त्यांनी
 सोलापूर येथे भाजप जिल्हा कोअर कमिटीची बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.