इको चालकांकडून रिक्षावाल्याला बेदम मारहाण

पनवेल शहरातील सोसायटी नाक्यावरील घटना
पनवेल/ प्रतिनिधी: – पनवेल शहरातील सोसायटी नाक्यावर,इको व्हॅन चालकांनी एका रिक्षावाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या  सुमारास ही घटना घडली.यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सहा आसनी रिक्षा इतिहासजमा होऊन आता त्यांची जागा इको व्हॅन चालकांनी घेतली आहे. बहुतांशी इको दांड फाटा परिसरात प्रवाशांची ने-आण करतात. बुधवारी सायंकाळी  सोसायटी नाक्यावर इकोचे चाक  रिक्षाचालकाच्या पायावरून गेले . यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन भांडणांमध्ये झाले. पाच ते सहा इको व्हॅन चालकांनी रिक्षावला दांडक्याने मारहाण केल्याचे समजते . त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. याठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. दरम्यान पनवेल शहर पोलिसांनी काही वेळातच घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.