कर्जत-जामखेडच्या बैल पोळयातही ठरलय

पुन्हा  प्रा .राम शिंदेचं
सणात दिसला विधानसभा निवडणुकीचा रंग
जामखेड/ प्रतिनिधी:- अहमदनगर चे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कर्जत जामखेड विधानसभा संघात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. आगामी निवडणुकीचा रंग  दोनही तालुक्यात शुक्रवारी पार पडलेल्या बैल पोळ्यातही दिसून आला. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोडीच्या अंगावर आमचंही  ठरलयं पुन्हा  प्रा. राम शिंदेचं असा संदेश या निमित्ताने दिला. या फोटोचे कुतूहल समाज माध्यमांवरही व्हायरल झाले.
या विधानसभा मतदारसंघाचे प्रा. राम शिंदे गेली दोन टर्म नेतृत्व करीत आहेत.  या तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे प्रयत्न अहमदनगर चे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी केले. या मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोट्यावधी रुपयांची  कामे सध्या दोनही  तालुक्यात सुरू आहेत. दरम्यान कर्जत-जामखेड करांनी पुन्हा एकदा प्रा. राम शिंदे च अशी अभियान राबवले  आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मी ही  ठरवलयं  प्रा . राम शिंदे यांना पुन्हा एकदा मंत्री करणार अशी घोषणा जाहीरपणे केली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणखीन नव उत्साह संचारला आहे. शुक्रवारी जामखेड कर्जत मध्ये बैलपोळा साजरा करण्यात आला. दरम्यान या दिवशी प्रत्येक शेतकरी आपल्या बैलजोडीला सजवतो. त्यांची शीग  साळून त्याला हिंगोळ  लावला जातो. त्याचबरोबर गोंडे बांधले जातात. त्यांना वेगवेगळ्या रंगाने रंगवून आगळा वेगळा साज चढवला जातो. एकंदरीतच वर्षभर आपल्या धन्यासाठी राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील या मुक सदस्याची पोळयाची दिवशी 
पूजा केली जाते. यंदा दुष्काळाचे सावट असतानाही कर्जत आणि जामखेडमध्ये श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. या  सणात विधानसभेच्या निवडणुकीचे रंग दिसून येत होते. येथील अनेक   बळीराजांनी आपल्या आवडत्या बैल जोडीच्या अंगावर आमचं ठरलंय पुन्हा  प्रा. राम शिंदे असा संदेश रंगाने रेखाटला होता. त्यानंतर ही सर्जा -राजाच्या   जोडीची गावात मिरवणूक काढण्यात आली. बैलपोळ्याच्या निमित्ताने कर्जत जामखेड च्या अनेक शेतकऱ्यांनी आपला नेता, आमदार आणि जिल्ह्याच्याव पालकमंत्र्यांप्रती  वेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त केलेच. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत आपले पाठबळ असल्याचेही या माध्यमातून दाखवून दिले.
    

Leave a Reply

Your email address will not be published.