उरण येथील ओएनजीसी मध्ये भीषण आग

लिक्विड गळती झाल्याचे कारण
उरण /प्रतिनिधी: – उरण ओएनजीसी येथील एलपीजी प्लांट मधील कॅन्टीन च्या पाठीमागे मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. लिक्विड गळती झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे माहिती पुढे आली आहे . दरम्यान आगीची तीव्रता मोठी असल्याने हा परिसर निर्मनुष्य करण्यात आल्याचे समजते. त्याच बरोबर दोन किमी अंतरावर जाण्यास मनाई करण्यात आले आहे. दरम्यान मोठी आग असल्याने येथील नाफ्ता पाण्यात सोडून देण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात इतकी मोठी आग पाहिली नव्हती असे प्रत्यक्षदर्शींच्या म्हणणे आहे. दरम्यान सर्व यंञणांचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली . त्याचबरोबर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचेही समजते.

Leave a Reply

Your email address will not be published.