मी कुठली संपत्ती घेऊन नव्हे तर या मातीत जन्माला आलोय

प्रा. राम शिंदे यांचा रोहित पवारांना टोला

 शिऊर येथे विविध उपक्रमांचा शुभारंभ
जामखेड: – प्रतिनिधी: – मी येथे कुठली संपत्ती घेऊन नव्हे तर या मातीत जन्माला आलोय. त्यामुळे येथील प्रश्नांना कायमची मूठमाती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचा सांगत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांना टोला लगावला. बाहेरील उमेदवार म्हणून पवार यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे त्यांनी कर्जत तालुक्यात नुकतीच जमिनी जमीन खरेदी केली. तो धागा पकडून पालकमंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या त्यांच्यावर टिकास्त्र सोडले.

शनिवारी तालुक्यातील शिऊर येथे ग्रामपंचायतच्या विविध कर वेळेवर भरण्यासाठीच्या “वर्षभर मोफत पीठ गिरणी” या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उदघाटन प्रा.राम शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे व पाईप लाईन दुरुस्ती कामाच्या भूमिपूजन, १४व्या वित्त आयोग अंतर्गत जि.प. शाळेला स्मार्ट टी.व्ही. व अंगणवाडीस साहित्य वाटप, आयुष्यमान भारत योजने अंतर्गत लाभार्थींना कार्ड वाटप तसेच रमाई आवास व पंतप्रधान अवास योजनेतून घरकुल लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
सहा कोटी रक्कमेचा सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. काम देखील शिऊर मध्ये सुरु झाले आहे त्याचा फायदा शिऊरसह परिसरातील बसरवाडी, भालकेवाडी, घाटेवाडी, गेंडवस्ती यासह परिसरातील अनेक गावांना, वाड्या-वस्त्यांना येत्या काळात होणार आहे असेही प्रा.राम शिंदे यांनी सांगितले.

यानंतर बसरवाडी येथे काल्याच्या कीर्तनात सहभागी झाले . त्यांनी यावेळी जिल्ह्यात तिसरी आणि तालुक्यात प्रथम आय.एस.ओ मानांकन मिळालेल्या बसरवाडी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, ग्रामशिक्षण समिती आणि सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले आणि या प्रणालीमुळे नक्कीच शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा होउन आपल्या भागातील विद्यार्थी उच्च पातळीवर भरारी घेतील अशी अशा व्यक्त केली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्री. रवी सुरवसे, पंचायत समिती माजी सभापती डॉ.श्री.भगवान मुरुमकर, सभापती कृ.उ.बा.स.श्री.गौतम अण्णा उतेकर, श्री.सोमनाथ राळेभात, सरपंच श्री.बापू निकम, उपसरपंच श्री.सिद्धेश्वर लटके, अरणगाव चे सरपंच श्री.लहू शिंदे, सरपंच श्री.काका चव्हाण, श्री.दादा जाधव, श्री.राजू देशपांडे, श्री.अशोक निमोनकर तसेच गावातील शिऊर, बसरवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.